पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

10. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस दहावा दि 16/10/22*

इमेज
  आमची दक्षिण भारत यात्रा  दिवस दहावा  -   दि 16/10/22 यात्रेचा शेवट आजचा यात्रेचा अखेरचा दिवस. हा परतीच्या प्रवासाचा दिवस खूप लवकर आला, इतक्या लवकर दहा दिवसांचा प्रवास संपला याच्यावर विश्वासच बसत नव्हता. सर्वांच्या सहवासात दहा दिवस कसे सरले हे कोणालाही कळले नाही. सर्व समवयस्क असल्यामुळे एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांची काळजी घेणे या गुणवैशिष्ट्यांमुळे आपसात कोणताही दुरावा किंवा कोणतीही रुष्टता, नाराजी न येता प्रवास अतिशय छान पार पडला.  त्याचा उत्तरार्ध म्हणजे आजचा परतीचा प्रवास. सकाळी आठ वाजता मदुराई येथून मुंबईचे विमान असल्यामुळे आम्ही लवकर उठून आमच्या दहा दिवसाच्या यात्रेच्या कुशल सारथ्याचा सत्कार केला. त्याला प्रेमाची भेट दिली . अतिशय सुरक्षित आणि कौशल्यपूर्ण ड्रायव्हिंग, अतिशय शांत व प्रेमळ व्यक्तिमत्व असलेला हा आमचा रिजिल भैया. त्याच्यामुळेच आमची ही दहा दिवसाची यात्रा निर्विघ्नपणे पार पडू शकली.   साडेसहाला विमानतळावर पोहोचलो. माझ्यासह अजून तीन ते चार जणांचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अतिशय उत्सुकता व कुतूहल होते.  चेक इन चे सर्व सोपस्कार पार पडले आणि एकदाचे आम्ही गॅलरीत

9. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस नववा दि 15/10/22*

इमेज
आमची दक्षिण भारत यात्रा  दिवस - नववा  दि   15/10/22 दहा दिवसांच्या यात्रेतला आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस. भारतातील  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, आणि चार धामांपैकी एक असलेल्या मंदिरातील श्री रामेश्वरम भगवानाचे दर्शन घेण्यासाठी, पहाटे लवकर उठून समुद्रावर पोहोचलो. सूर्य देवाच्या आगमनापूर्वीच जोडीने समुद्र स्नान केले. जोडीने सूर्याला अर्ध्य वाहिले आणि नंतर तसेच ओलेत्याने मंदिरात पोहोचलो. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिरात प्रवेश करण्या अगोदर येथे रांगेने 22 कुंडांमध्ये स्नान करावे लागते. स्नानाचा प्रत्यक्ष अर्थ न घेता, येथे ठिकठिकाणी ओळीने असे 22 छोटी छोटी  कुंड आहेत. त्या ठिकाणी उभा असलेला मंदिराचा सेवेकरी हा आलेल्या भाविकांवर कुंडातील पाण्याचा बादलीने शिडकावा करतो किंवा थोडे थोडे पाणी डोक्यावर शिंपडत जातो. अशा रीतीने 22 कुंडांचे स्नान करून आम्ही मुख्य मंदिरात पोहोचलो. अतिशय पवित्र आणि मंगलमय वातावरणात रामेश्वर भगवान आणि विश्वनाथ भगवान यांच्या पिंडीचे यांचे दर्शन घेतले.  रामेश्वरमच्या प्रसिद्ध मंदिर स्थापनेबद्दल अनेक मनोरंजक कथा सांगितल्या जातात. सीतेच्या सुटकेसाठी रामाने लंकेवर

8. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस आठवा दि 14/10/22*

इमेज
 आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस आठवा  दि  14/10/22 काल सायंकाळी ढगांसोबतच्या चढाओढीत, सुर्यदेवाने आम्हाला सुर्यास्ताचा आनंद मिळू दिला नव्हता. पण किमान  सूर्योदय तरी पाहायचाच हे ठरवले होते.  आजची पहाट सर्वांना सूर्योदयाची एक अद्भुत अनुभूती देणारी ठरली. पहाटे पाच वाजता उठून सर्वजण हॉटेलच्या टेरेसवर जमले आणि समुद्रातून वर येणाऱ्या सूर्याच्या आगमनाची चाहूल देत त्याची सोनेरी प्रभा सर्व आसमंतात पसरू लागली. पाठोपाठ दिवसभरासाठी जगावर राज्य गाजवण्याकरिता सज्ज होत  हळूहळू सूर्यदेवाचे आगमन झाले. हॉटेल मधील अनेक पर्यटक देखील आमच्या सोबत ह्या क्षणांचे साक्षीदार झाले होते. एवढेच नव्हे, खाली समुद्रकिनारी तर पर्यटकांचा जणू  मेळावाच हे सर्व अनुभवत होता. या रोमांचकारी अनुभवाने सर्वच मंत्रमुग्ध होऊन  गेलो.  त्यानंतर सुरू झाला आमचा या दौऱ्यातला सर्वात मोठा प्रवास. सव्वा तीनशे किलोमीटरचा कन्याकुमारी ते रामेश्वरम व धनुष्कोटी हे अंतिम टोक.  या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे एनएच - 44 हा  राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर बांधलेला असून त्याची देखभाल देखील उत्तम ठेवलेली आहे. अक्षरशः पोटातले पाणीदेखील हलत नाही. रस्त्य

7. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सातवा दि 13/10/22*

इमेज
  आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सातवा  दि  13/10/22 आजचे नियोजन म्हणजे पहाटे श्री पद्मनाभ स्वामींचे मंदिर दर्शन आणि कन्याकुमारी साठी प्रयाण असे होते. काल सायंकाळी कोवलम बीच ची मजा घेतल्यानंतर आज पहाटे दोन वाजता उठून तीन वाजता श्री स्वामी पद्मनाभ स्वामी मंदिरात पोहोचलो. साडे तीन ते पाच अशी भेटीची वेळ होती. पहाट असल्यामुळे गर्दी कमी होती. त्यामुळे अतिशय सुंदर दर्शन झाले.  मल्याळम आणि तमिळमधील 'तिरुवनंतपुरम' शहराचे नाव "लॉर्ड अनंताचे शहर" (अनंत हे विष्णूचे रूप आहे ) असे आहे.  जुन्या आख्यायिकेनुसार या सर्व भागात घनदाट अरण्य होते. या जंगलातच विष्णूची मूर्ती मिळाली व तिची स्थापना करण्यात येऊन प्रसिद्ध पद्मनाभस्वामीचे मंदिर बांधण्यात आले. हे हिंदू मंदिर फार जुने असून त्यातील लाकडावरील कोरीव काम आणि गोपुरे प्रसिद्ध आहेत. भिंती उंच असून, यांशिवाय दगडावरील कोरीव कामात रामायण आणि महाभारत यांतील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत.  मंदिर चेरा शैली आणि द्रविडीयन वास्तुकलेच्या गुंतागुंतीच्या संमिश्रणात बांधले गेले आहे.  काही प्रमाणात हे मंदिर तामिळनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातील तिरु

आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सहावा दि 12/10/22

इमेज
 आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सहावा  दि 12/10/22 आजचा प्रवास हा आलेप्पी ते त्रिवेंद्रम - अंदाजे १५५ किलोमीटरचा होता.  सकाळी हाऊस बोट वर नाश्ता करून  पुढील प्रवासास निघालो. अतिशय आल्हाददायक वातावरण ... नेहमीप्रमाणे सकाळची भजने, गाणे म्हणत मार्गक्रमण सुरू झाले.  शहर सोडल्यानंतर पुढे रस्त्याच्या दुतर्फा रबराचे मळे दिसू लागले.  रबराच्या झाडाचा चिक काढण्यासाठी प्रत्येक झाडाला ठराविक प्रकारचा काप देऊन त्याच्या टोकाशी भांडे लटकविण्यात येते.  या भांड्यांमध्ये जमा होणाऱ्या चिकापासून रबर व त्यापासून पुढे विविध वस्तू बनवतात.  रबराची ही झाडे नारळीच्या झाडांसारखेच अतिशय उंच होती.  गाडीमध्ये सोबत आणलेला, खाऊ रस्त्याने मिळणारी फळे, चहा, नारळ पाणी इत्यादीचा आस्वाद घेत, कधी गाडीतील टीव्हीवर पिक्चर बघत,  गाणे ऐकत, त्रिवेंद्रम पासून अवघ्या 15-16 किलोमीटर अलीकडे असलेल्या कोवलम बीच वर कधी पोहोचलो ते समजले देखील नाही. रस्त्यात एक गोष्ट प्रामुख्याने दिसली, ती म्हणजे किनारपट्टी असल्याने सर्व घरे / गावे ही रस्त्यांवरच दिसून आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे व दुकाने. एक गाव केंव्हा संपले व दुसरे कधी सुरू झा

आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस पाचवा दि 11/10/22

  * आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस पाचवा          दि 11/10/22* आजचा दिवस हा टेकडी ते आलेप्पी हा दीडशे किलोमीटर प्रवासाचा व हाउसबोटीवरील मुक्कामाचा होता.  येथे एक आठवण प्रकर्षाने होते ती म्हणजे,  दररोज सकाळी लवकर उठल्यावर, नाश्त्याला एकत्र जमले की,  माऊली अर्थात बाळासाहेब यांनी पूर्ण यात्रेदरम्यान पाळलेले एक तत्व.  ते म्हणजे स्वतःच्या हाताने सर्वांना सकाळी सकाळी अष्टगंध लावून एक प्रकारे धार्मिक वातावरणाची सुरुवात करत असत. मुक्कामी असलेले हॉटेल पेपरवाइन (इंटर ग्रँड हॉटेल) चा परिसर अतिशय सुरेख होता.  परिसरातील बगिच्या मध्ये पुन्हा एकदा सर्वांनी मनसोक्त फोटोग्राफीचा आनंद घेतला आणि नाश्त्यानंतर पुढील प्रवासास निघालो.   आलेप्पी या शहराला खरे तर आलपूझा असे नाव आहे, पण व्यवहारात मात्र आलेप्पी असेच रूढ झाले आहे.  अलप्पुळा शहर एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील कालवे व निसर्गरम्य खारकच्छांमुळे ह्यास पुर्वेकडील व्हेनिस (Venice of the East) असेही म्हणतात. वेंबनाड सरोवराच्या दक्षिण टोकास स्थित असल्यामुळे अलाप्पुळाहून निवासी बोटीमधून २-३ दिवसांची सफर हे येथील मोठे आकर्षण आहे. दुपारी साधारणतः एक वाजेच

4. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस चौथा दि 10/10/22*

 *आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस चौथा          दि 10/10/22* आज सकाळी मुन्नार हून टेकडी साठी प्रयाण केले.  रस्त्यात वंदनमेडू येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठे गणपती मंदिर आहे.  या गणपतीची मूर्ती 38 फूट उंच असून काळ्या दगडात अतिशय रेखीवपणे घडवली आहे. ही भारतातील एकमेव गणेश मूर्ती अशी आहे की जिला वेलचीचा प्रसाद चढवला जातो. गणाधीशाचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. साधारणतः बारा वाजेच्या दरम्यान आम्ही कुमिली अर्थात टेकडी येथे पोहोचलो.  एकदा मुन्नार सोडले की मग पर्वतीय प्रदेश संपून सपाट प्रदेश सुरू होतो.  या टेकडी गावाच्या  मध्यान्नी अंदाजे दोन एकर जागेत हत्तीवर सफारी करता येते. त्यासाठी एक मानवनिर्मित कृत्रिम जंगल बनवण्यात आले आहे. आम्ही आतापर्यंत लहान मुलांना उंटावर, घोड्यावर, हत्तीवर बसवले, पण स्वतः मात्र कधी बसलो नव्हतो.  आमच्यापैकी काहींनी ती हौस येथे, जोडीने हत्तीवर बसून पूर्ण केली.  अंदाजे दहा फूट उंचीचे ते अजस्त्र हत्ती,  त्यावर बनविलेल्या अंबारीवजा आसनावर आपण बसायचे आणि मग तो डुलत डुलत एक मोठा चक्कर मारून आपल्याला परत जागेवर आणतो.  केदारनाथ यात्रेदरम्यान मी दोनदा घोड्यावरून पड

3. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस तिसरा - दि 9/10/22

 *आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस तिसरा - दि 9/10/22* आजचा दिवस हा मुन्नार येथे चहाचे मळे, चहाचे उत्पादन करणारी कंपनी, विविध औषधी वनस्पतींचा बगीचा व त्यांचे शोरूम इत्यादीसाठी राखीव होता.   इडुक्की जिल्ह्यातील, देवीकुलम तालुक्यातील मुन्नार ही केरळमधील सर्वात मोठी पंचायत आहे. मुथिरापुझा, नल्लाथन्नी आणि कुंडला या तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या मोक्याच्या ठिकाणावरून मुन्नारला हे नाव मिळाले. 'मूनू' म्हणजे 'तीन' आणि 'अरू' म्हणजे 'नदी'.   सकाळी ऊठून गॅलरीत आल्यावर एकदम ढगातच असल्यासारखे वाटले.  समोरचा डोंगर काहीच दिसत नव्हता.  संपूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली होती. घाटातून जाणाऱ्या वाहनांचा आवाज व  दिवे तेवढे दिसत होते.. पाहता पाहता ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आणि झपाट्याने धुके दूर होण्यास सुरुवात झाली. धुक्याचे ढग उंचावरून खाली येणे आणि पुन्हा त्याच पद्धतीने नाहीसे होणे हा प्रत्यक्ष अनुभव इतक्या जवळून पाहतांनाचे शब्दात वर्णनच करता येत नाही. धुके जाऊन ऊन आल्यावर दिसणारे समोरचे दृश्य अवर्णनीय  होते.  लांबच लांब पसरलेले एकसारखे दिसणारे चहाचे मळे, त्यातून जाणारी नाग

2. आमची दक्षिण भारत यात्रा - दुसरा दिवस दि. 8/10/22*

 *आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस दुसरा                  दि 8/10/22* सकाळी बरोबर आठ वाजेच्या दरम्यान गाडी त्रिशूल येथे पोहोचल्यावर लगेचच आमच्यासाठी स्टेशनवर पुढील 8 दिवसांसाठी लागणारी वातानुकूलित गाडी तयार होती. खऱ्या अर्थाने नऊ दिवस व  आठ रात्रीच्या प्रवासाची सुरुवात झाली. लगेचच आम्ही मुन्नार साठी प्रयाण केले. रस्त्यातच श्री गुरुवायूर नावाचे पवित्र स्थान आहे., तेथे भेट दिली. गुरुवायूर मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर शहरात आहे. मंदिराच्या गाभार्‍यात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित आहे. मंदिरात बसवलेली मूर्ती शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. गुरुवायूर मंदिर 5000 वर्षे जुने आहे. या मंदिरात फक्त हिंदूच पूजा करू शकतात हे विशेष.  हे केरळच्या हिंदूंसाठी सर्वात महत्वाच्या प्रार्थना स्थळांपैकी एक आहे. यालाच भूलोकावरील वैकुंठ, पृथ्वीवरील विष्णूचे पवित्र निवासस्थान म्हणून देखील ओळखले जाते. गुरुवायूर मंदिराची प्रमुख देवता श्रीविष्णू आहे, ज्याची पूजा कृष्ण अवतार म्हणून केली जाते. येथे श्री कृष्णाला *गुरुवायुरप्पन* असे म्हटले जाते, जे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप आहेत.  या नावाविषयी एक प

1. आमची दक्षिण भारत यात्रा - पहिला दिवस दि. 7/10/22*

 *आमची दक्षिण भारत यात्रा - पहिला दिवस दि. 7/10/22* आज पहाटे सव्वातीन वाजता नाशिकरोड हून एरणाकुलम मंगला एक्सप्रेसने प्रवासास सुरुवात झाली.  गाडी पकडण्यासाठी आत्तापर्यंत सर्व जागे राहिल्याने, लगेच डब्यात आपापल्या जागा पकडून पथार्‍या टाकल्या.  सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य दिसण्यास सुरुवात झाली.  सुरुवातच कोकण  दर्शनाने झाली असल्याने मन प्रसन्न होते. बाहेरील वातावरण देखील अतिशय छान होते.  नुकताच पावसाळा संपत आलेला. त्यात चहूकडे फक्त हिरवीगार गालिचेच अंथरलेले जणू. नुसती हिरवाई... सर्व डोंगरांनी गर्द हिरवीदार चादर पांघरलेली... छोट्या-मोठे आकाराचे खळाळते धबधबे डोंगरांच्या अंगा खांद्यावरून वाट शोधत शुभ्रपणा लेउन धरतीकडे झेपावत होते.  तशातच मधूनच त्यावर कोवळे ऊन पडले की हवेत उडणारे चमकणारे शुभ्र तुषार .... हा निसर्गाचा अतिशय नयनरम्य व अद्भुत देखावाच पदोपदी समोर येत होता. यावेळेस हटकून म्हणावेसे वाटले, " *यावा कोकण आपलाच असा"* . आपल्याकडे एका आमदार महोदयांनी केलेले वक्तव्य आठवले... " *काय ते डोंगार, काय ती झाडी, काय तो निसर्ग!!!अहाहा, सगळे कसे एकदम ओके...&qu

नियोजन - आमची दक्षिण भारत यात्रा...

 * आमची दक्षिण भारत यात्रा नियोजन ... *  मागे उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही मे 22 मध्ये उत्तराखंड येथील चारधाम यात्रा करून आलो होतो. ऑक्टोबर मध्ये दुसरे धाम म्हणून श्रीक्षेत्र रामेश्वर या ठिकाणास भेट व केरळ, कन्याकुमारी, दक्षिण भारत दर्शन असे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मागील अनुभवावरून सर्वांचे आधार कार्ड, पॅन कार्ड इ. कागदपत्रांची जमवाजमव करून नियोजन ठरले. दिनांक 7 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर असा हा दौरा ठरला. पहिल्या यात्रा ग्रुप मधील दोन जोड्या रद्द झाल्याने नवीन सभासद शोधणे आले. जुन्यापैकी मी म्हणजे विलास घोलप,  राजेंद्रजी पोतदार, जयरामजी गांगुर्डे, बाळासाहेब कोठुळे हे आणि नवीन सदस्यांपैकी धनंजयजी वाड, शिवाजीराव ताजनपुरे, बाळासाहेब कोठुळे यांचे साडू दिंडोरीचे श्री संपतराव जाधव,  सांख्यिकी अधिकारी श्री राजेंद्रजी सूर्यवंशी आणि नरेशजी बोरसे अशा नऊ जोड्या आणि टूर मॅनेजर श्री अरुणजी सूर्यवंशी काका असे एकूण 19 जण नक्की झाले.  जाताना केरळ मधील कोचीपर्यंत रेल्वेने व परतीला मदुराई हुन मुंबईपर्यंत विमानाने यायचे असे ठरले. गौरवदादाने लगोलग रिझर्वेशन ची औपचारिकता देखील पूर्ण करण्यात केली. दिनांक सह

गिरणार पर्वत - दत्त महाराज आणि श्री गोरक्षनाथ यांची माहिती देणारा लेख

 आमच्या ग्रुप च्या सौ अंजली काळे यांनी गिरणार पर्वत - दत्त महाराज आणि श्री गोरक्षनाथ यांची माहिती देणारा लेख शेअर केला होता, तो पुढील प्रमाणे - 💐 खूपच छान लेख 💐 गोरक्षनाथ महाराज यांच्या साधनास्थानाविषयी थोडी माहिती करून घेऊयात गोरक्षनाथ टूक याची उंची 3660 फूट आहे तर गुरुशिखर आणि अंबामाता या दोन शिखरांची उंची 3600 फूट आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि एक कथा आहे ती कथा अशी एकदा गोरक्षनाथ महाराजांनी मंत्र सिद्धीने भोजन सिद्ध केले आणि भक्तांना भोजनात बोलावले त्यावेळेस अवधूत स्वरूपातील एक संन्यासी तेथून जात असताना त्यांना गोरक्षनाथांनी निमंत्रण दिले परंतु मी सिद्ध केलेले भोजन ग्रहण करत नाही असे उत्तर त्या अवधूतांनी गोरक्षनाथांना दिले ते उत्तर ऐकून आश्चर्यचकित झालेल्या गोरक्षनाथांनी त्या अवधूतास मी सिद्धीने भोजन तयार केले आहे हे कसे समजले असे विचारले त्यावर या त्रिलोकातील सर्व काही गोष्टी मला ज्ञात आहेत असे अवधूत सांगतात.  या उत्तराने गुरु गोरक्षनाथांचा यांचा अहंकार डिवसला गेला त्यावर गोरक्षनाथांनी मी या त्रिभुवानामध्ये लपतो आणि तुम्ही मला शोधून काढा तुम्ही मला शोधून काढू शकणार नाही आणि

सातवा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 सातवा दिवस - 11/2/23 पहाटे 3 च्या दरम्यान डहाणू स्टेशन येणार असल्याने निश्चिन्त झोपण्याचा प्रश्नच नव्हता, 2 वाजताच उठून आपापल्या बॅगा व सामान सांभाळत, दरवाजात एकमेकाला सावरत सगळे स्टेशनची वाट पाहत होतो, अंधार वेगाने चिरत पहाटे 3.30 ला, गाडी डहाणूला आम्हाला उतरवून पुढे मुंबई ला रवाना झाली अन महत्वाचा टप्पा पार पडला.  टाटा ... धन्यवाद रेल्वे, आम्हाला वेळेत आणि सुखरूप पोहोचवण्या बद्दल.... आम्हाला घेण्यासाठी नाशिक हुन गाडी आलेलीच होती. लगेच तिच्यात बसून नाशिकसाठी प्रयाण केले. काही डुलकी घेत, काही गप्पा मारत, यात्रेतील आठवणींमध्ये गुंगले होते, काही मनाने केंव्हाच घरी पोहोचले होते. रस्त्यात एके ठिकाणी पहाटेचा चहा घेत, रस्त्याने गाडीतुन च त्रिंबकेश्वर महाराजांचे दर्शन घेत असताना सुर्यादेवानेही दिलेले दर्शन सर्वाना आनंदित करून गेले,. आपल्या शहरात, आपल्या मातीत पाऊल ठेवण्याचा आनंद वेगळाच, त्याबरोबर आपल्याला घेण्यासाठी कोणीतरी आले ही अनुभूती देखील सुखावणारी होती. सर्वांनी पुन्हा लवकर भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकांचा निरोप घेतला... अशा रीतीने बहुप्रतिक्षित अशी यात्रा यशस्वी पार पडली... या यात्रे

सहावा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 सहावा दिवस - 10/2/23 यात्रा खऱ्या अर्थाने काल संपली. आज परतीच्या प्रवासाची औपचारिकता बाकी. सकाळी लवकर आवरून सर्व नाश्त्याला जमले. आज परतीच्या प्रवासा व्यतिरिक्त कोठे जायचे नसल्याने सर्व तसे निवांत होते, पण इतक्या लवकर यात्रा संपल्याची रुखरुख कोठेतरी प्रत्येकाच्या मनात होती. अजून 4-5 दिवस तरी यात्रा असावी असे वाटत होते. जुन्यांचे एकमेकांशी संबंध होतेच पण नव्याने ग्रुप मध्ये सहभागी झालेल्या काळे, कोल्हे, सलादे, खैरनार व नेरकर कुटुंब  यांच्याशीही  सर्वांचे  5 दिवसांतच मैत्रीचे व सलोख्याचे ऋणानुबंध निर्माण झाले.  अशा भावुक वातावरणातच सर्व असतांनाच,  काका व सौ शुभांगी वहिनींनी समारोपाच्या कार्यक्रमाची तयारी केली. प्रत्येकाने यात्रेदरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले. मातोश्री कडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या व दिलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले आणि भविष्यातील यात्रेला असेच सहकार्य, शुभेच्छा आणि प्रतिसाद लाभेल अशा प्रकारची ग्वाही दिली. त्यानंतर लगेचच जुनागड येथून सुरेंद्रनगर पर्यंतच्या प्रवासास सुरवात केली. आरक्षण केलेली ट्रेन सुरेंद्र नगर पासून निघणार असल्याने हा द्राविडी प्राणाया

पाचवा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 पाचवा दिवस - 9/2/23 आज यात्रेचा अखेरचा दिवस.  दिवसही महत्त्वाचा. गिरणार पर्वत चढाई करायची, दत्त महाराजांचे दर्शन घ्यायचे... गिरनार पर्वत हा जुनागडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. हा गुजरातमधील गिरिमाला पर्वतांचा समूह आहे. गिरनार पर्वत हे हिंदूंचे पवित्र स्थान आहे आणि जैन धर्मियांच्या पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते. हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. हे दत्तमंदिर गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे.  यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे.   गिरनारला जाण्यास रिक्षा / बस अशी वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत.  सर्वांनाच अतिशय उत्सुकता लागलेली; तितकीच धाकधूकही... आपण चढू शकू की नाही ???  पण आजचा वार गुरुवार - श्री गुरुदत्ताचा वार, आणि त्यातही संकष्टी चतुर्थ

चौथा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 चौथा दिवस - 8/2/2023 यात्रेच्या कार्यक्रमातला आजचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे श्री द्वारकाधीश यांचे दर्शन . सकाळी सहालाच उठून साडेसहाच्या आरतीच्या हिशोबाने सर्वजण मंदिरात पोहोचलो. द्वारकाधीश मंदिर , ज्याला जगत मंदिर , निज मंदिर आणि द्वारकाधीश असेही म्हणतात, असे  हे श्रीकृष्णाला समर्पित हिंदू मंदिर आहे. याची येथे द्वारकाधीश किंवा 'द्वारकेचा राजा' या नावाने पूजा केली जाते . हे मंदिर भारतातील हिंदू तीर्थक्षेत्र असलेल्या चार धामपैकी एक आहे .  72 खांबांवर बांधलेली ही पाच मजली इमारत आहे मंदिराला दोन महत्त्वाचे प्रवेशद्वार आहेत, एक मुख्य प्रवेशद्वार आहे ज्याला मोक्षद्वार म्हणतात (म्हणजे "मोक्षाचे द्वार") आणि बाहेर पडण्याचा दरवाजा जो स्वर्गद्वार म्हणून ओळखला जातो .  आमच्यासारख्याच आरतीला आलेल्यांचीच फक्त गर्दी होती. आरती आटोपल्यानंतर गर्दीतील दर्शनाने मन न भरल्याने पुन्हा एकदा सर्वांनी जाऊन निवांत दर्शन घेतले. मंदिर व मंदिर परिसरातील सर्व छोट्या-मोठया देवतांची मंदिरे पाहण्यात बराच वेळ गेला. मंदिर अतिशय प्राचीन असून मंदिराला असंख्य गोपुरे आहेत. असे दगडाचे बांधकाम आजच्या काळात अश

तीसरा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 तिसरा दिवस - 7/3/2023 नव्या उत्साहाने नव्या दिवसाची सकाळ उगवली . काकांच्या आदेशानुसार सर्वजण नाश्त्यासाठी जमले. हॉटेलच्या आवारात केवळ फोटोग्राफीसाठी छानशा सिंह आणि हरणांच्या मूर्ती (पुतळे) ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासोबत आपण फोटोग्राफीचा  आनंद घेऊ शकतो.  काहींनी काल राहिलेले सिंहासोबतचे  फोटो सेशनची हौस भागवून घेतली. सर्वांनी पोटभर नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि द्वारके साठी रवाना झालो. रस्त्याच्या दुतर्फा विस्तीर्ण पसरलेल्या नारळीच्या बागा, अतिशय सुंदर रस्ता, आणि बाजूनेच असलेला अरबी समुद्र;  मनाला रिझवित होता.  त्याचवेळी गाडीत रंगलेला भक्ति रसाचा महापूर वाहू लागला होता. अनेकांचा अनेक दिवसांपासून दबलेला आवाज स्वयंस्फूर्तीने  बाहेर येत होता.  सर्वांच्याच कलागुणांना येथे वाव असल्याने अतिशय मजा आली. वातावरण अतिशय धुंद होऊन गेले होते हरिभक्त परायण बाळूदादा महाराज विहीतगावकर आणि आध्यात्मिक, योगगुरु नेरकर दादा यांच्या *कानडा राजा* ने महेश काळे व राहुल देशपांडे यांच्यातील जुगलबंदी आठवली. शुभांगी वहिनींचा *विठ्ठल जागर* सर्वांना वेगळ्याच विश्वात घेऊन गेला,  साथसोबतीसाठी अवंतीवहिनी, चारुवाहिनी आणी क

दुसरा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 दुसरा दिवस - 6/2/23 पूर्वीच्या काळी सैनिक राजे राजवाडे हे घोड्यावर झोपा घेत. आम्ही मात्र चाकांवर झोप घेऊन 6 वाजताच उठून  बसलो.  बरोबर सात वाजता गाडी वेरावळ ला पोहोचली.  इच्छित स्थळी वेळेत पोहोचल्याच्या आनंदातच घेण्यास आलेल्या मोठ्या गाडीतून हॉटेलवर पोहोचलो. ताजेतवाने होऊन , नाश्ता करून सोमेश्वर भगवान यांचे दर्शन घेण्यासाठी प्रस्थान केले .  सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. सोमनाथ मंदिर, ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात, हे भारताच्या गुजरातमधील प्रभास पाटण, वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले मानले जाते.  हे वेरावळ रेल्वे जंक्शनच्या आग्नेयेस सुमारे 7 किमी  आहे.  आपल्या नाशिकच्या नवीन स्वामींनारायन मंदिराप्रमाणे  दगडी बांधकाम असलेले हे अतिशय पुरातन मंदिर हजारो वर्षांपासून समुद्रकाठी दिमाखात उभे आहे.  भगवान शंकराचे शिवलिंग आणि मूर्ती अतिशय सुबक आणि देखणी आहे . संपूर्ण मंदिराला आतल्या बाजूने सोन्याचा मुलामा केलेला आहे. दोन्ही हातांच्या कवेत मावणार

पहिला दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 पहिला दिवस - 5/3/2023 आज यात्रेचा पहिला दिवस. अतिशय उत्साहाने सर्व जण बरोबर वेळ पाळण्यासाठी धावपळ करीत ठरलेल्या ठिकाणी जमले. अहाहा, काय तो उत्साह होता, एक एकाच्या चेहऱ्यावर... सगळे साठीच्या घरातले, अन लगबग तिशीच्याला लाजवेल अशी. सोबत सगळ्यांना सोडण्यासाठी आलेल्या लेकी, सुना, मुलं, नातवंडं, जावई या सर्वांना देखील हा उत्साह पाहून आश्चर्य वाटलं असेल... आनंदाची बाब म्हणजे, दत्त महाराजांच्या आदेशावरून, हाय कोर्टाला देखील माघार घेत सूर्यवंशी वहिणींचा व पर्यायाने त्यांच्या बहिणीचा गिरणार मार्ग खुला करावा लागला. पहीलटकरणी सारखे नाविनपन दूर झाल्यावर काळे साहेब, सलादे साहेब, साडू कोल्हे सर हेही मिसळून गेले, बाकीचे सर्व मुरलेले आंबे !!! गप्पांच्या नादात अन जेवणाच्या जागेच्या शोधात, वेड्या वाकड्या रस्त्याने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत डहाणू कधी आले ते समजलेही नाही. मग काय; मस्त प्लॅटफॉर्मवरच सगळ्यांनी बैठक मांडत सर्वांच्या घरून आलेल्या पंचपक्वाणावर ताव मारत तृप्तीचा ढेकर दिला, अन भल्या पहाटे उठून केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान महिला वर्गाच्या चेहऱ्यावर दिसले. दरम्यान गाडी ढकलण्याच्या नादात क

गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल

 माहे मे 2022 मध्ये उत्तराखंड येथील चारधाम यात्रा ज्यामध्ये केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री यासह ऋषिकेश व हरिद्वार या  स्थानांचा समावेश होता आणि ऑक्टोबर 22 मध्ये दक्षिण भारत ज्यात केरळ, कन्याकुमारी, रामेश्वर व मदुराई या स्थानांचा समावेश असलेल्या यात्रांचे यशस्वी आयोजन झाल्यानंतर आम्ही पुढील टप्पा म्हणजे गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी यात्रेचे नियोजन केले.  सहभागी होणाऱ्या सर्व सभासदांचे निश्चितीकरण झालेनंतर, 5 फेब्रुवारी 23 ही तारीख निश्चित करण्यात आली. पुढील प्रमाणे सूचना सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आले. पुढील रविवारी सकाळी 9 वा आपण यात्रा सुरू करणार आहोत.  5.2.23 रविवारी -  9.00 - प्रवास सुरु 11.30 - रस्त्यात जव्हार किंवा डहाणूच्या आसपास हॉटेल ला जेवण 3.00 - डहानू येथून रेल्वे प्रवास सुरु ( गाडीतील रात्रीच्या जेवणाचा डबा घरून आणावा) 6.2.23 सोमवार -  7.00 - वेरावळ (सोमनाथ) येथे आगमन,  उर्वरित कार्यक्रम पुढील नियोजना प्रमाणे ..