गिरणार पर्वत - दत्त महाराज आणि श्री गोरक्षनाथ यांची माहिती देणारा लेख
आमच्या ग्रुप च्या सौ अंजली काळे यांनी गिरणार पर्वत - दत्त महाराज आणि श्री गोरक्षनाथ यांची माहिती देणारा लेख शेअर केला होता, तो पुढील प्रमाणे -
💐 खूपच छान लेख 💐
गोरक्षनाथ महाराज यांच्या साधनास्थानाविषयी थोडी माहिती करून घेऊयात गोरक्षनाथ टूक याची उंची 3660 फूट आहे तर गुरुशिखर आणि अंबामाता या दोन शिखरांची उंची 3600 फूट आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि एक कथा आहे ती कथा अशी एकदा गोरक्षनाथ महाराजांनी मंत्र सिद्धीने भोजन सिद्ध केले आणि भक्तांना भोजनात बोलावले त्यावेळेस अवधूत स्वरूपातील एक संन्यासी तेथून जात असताना त्यांना गोरक्षनाथांनी निमंत्रण दिले परंतु मी सिद्ध केलेले भोजन ग्रहण करत नाही असे उत्तर त्या अवधूतांनी गोरक्षनाथांना दिले ते उत्तर ऐकून आश्चर्यचकित झालेल्या गोरक्षनाथांनी त्या अवधूतास मी सिद्धीने भोजन तयार केले आहे हे कसे समजले असे विचारले त्यावर या त्रिलोकातील सर्व काही गोष्टी मला ज्ञात आहेत असे अवधूत सांगतात.
या उत्तराने गुरु गोरक्षनाथांचा यांचा अहंकार डिवसला गेला त्यावर गोरक्षनाथांनी मी या त्रिभुवानामध्ये लपतो आणि तुम्ही मला शोधून काढा तुम्ही मला शोधून काढू शकणार नाही आणि शोधून काढलेत तर त्रिभुवनामध्ये तुम्ही कोठेही लपा मी तुम्हाला शोधून काढीन असे अवधूतांना एक आव्हान दिले.
अवधूतांनी ते आव्हान मान्य केले अवधूताने डोळे मिटल्यावर गोरक्षनाथ अदृश्य झाले अवधूतांनी गोरक्षनाथांची लपलेली जागा शोधून त्यांना उठवले आता अवधूतांची लपण्याची पाळी होती आणि गोरक्षनाथांनी त्यांना शोधायचे होते त्यानुसार गोरक्षनाथांनी डोळे मिटले आणि गुरु दत्तात्रय अंतर्धान पावले स्वर्ग पृथ्वी आकाश पाताळ सर्व ठिकाणी शोधले परंतु अवधूत त्यांना कुठेही दिसले नाहीत. त्यांनी हार मानली आणि अवधूतांना प्रकट होण्याची प्रार्थना केली.
गोरक्षनाथांच्या प्रार्थना नंतर अवधूत प्रकट झाले गोरक्षनाथांनी त्यांना विचारले की मी त्रिखंडात तुम्हाला शोधले परंतु तुम्ही सापडला नाहीत तुम्ही नेमके कुठे लपला होतात त्यावर अवधूत त्यांनी उत्तर दिले उत्तर लक्षात घेण्यासारखे आहे अवधूत म्हणाले मी तुझ्या मध्येच लपलो होतो हे उत्तर ऐकून गोरक्षनाथांचे डोळे उघडले याचे कारण सर्वसामान्य मनुष्य असो सिद्ध पुरुष आपल्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला नाही तर आपली सिद्धी आणि साधना व्यर्थ आहे असा धडा अवधूतांनी गोरक्षनाथांना आणि आपल्या सर्वांना या निमित्ताने दिला आहे .
त्यानंतर गोरक्षनाथांनी अवधूत यांना आपण कोण आहात आपले खरे स्वरूप सांगावे अशी विनंती केल्यावर गुरुदत्तात्रेयाने आपले खरे स्वरूप त्यांच्यासमोर प्रकट केले ते स्वरूप पाहून गोरक्षनाथांनी गुरुदत्तात्रेयांची क्षमा मागून गिरनार च्या आपल्या पादुकांचे मला दररोज दर्शन व्हावे असा एक वर मागितला यासाठी गुरुदत्तात्रेयांनी आपल्या पादुका स्थानाच्या समोरील टेकडीवर साधना करण्याचा गोरक्षनाथांना आदेश दिला हे स्थान दत्तात्रेयांच्या पादुका स्थानापेक्षा साठ फूट उंच असल्यामुळे तिथूनच गोरक्षनाथांना गुरु दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन होत होते गोरक्षनाथांची इच्छा अशा रीतीने गुरुदत्तात्रेयाने पूर्ण केली.
सौजन्य: श्री क्षेत्र गिरनार
Very nice illustration
उत्तर द्याहटवा