1. आमची दक्षिण भारत यात्रा - पहिला दिवस दि. 7/10/22*

 *आमची दक्षिण भारत यात्रा - पहिला दिवस दि. 7/10/22*


आज पहाटे सव्वातीन वाजता नाशिकरोड हून एरणाकुलम मंगला एक्सप्रेसने प्रवासास सुरुवात झाली.  गाडी पकडण्यासाठी आत्तापर्यंत सर्व जागे राहिल्याने, लगेच डब्यात आपापल्या जागा पकडून पथार्‍या टाकल्या.  सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य दिसण्यास सुरुवात झाली.  सुरुवातच कोकण  दर्शनाने झाली असल्याने मन प्रसन्न होते. बाहेरील वातावरण देखील अतिशय छान होते.  नुकताच पावसाळा संपत आलेला. त्यात चहूकडे फक्त हिरवीगार गालिचेच अंथरलेले जणू. नुसती हिरवाई... सर्व डोंगरांनी गर्द हिरवीदार चादर पांघरलेली... छोट्या-मोठे आकाराचे खळाळते धबधबे डोंगरांच्या अंगा खांद्यावरून वाट शोधत शुभ्रपणा लेउन धरतीकडे झेपावत होते.  तशातच मधूनच त्यावर कोवळे ऊन पडले की हवेत उडणारे चमकणारे शुभ्र तुषार .... हा निसर्गाचा अतिशय नयनरम्य व अद्भुत देखावाच पदोपदी समोर येत होता. यावेळेस हटकून म्हणावेसे वाटले, " *यावा कोकण आपलाच असा"* . आपल्याकडे एका आमदार महोदयांनी केलेले वक्तव्य आठवले...

" *काय ते डोंगार, काय ती झाडी, काय तो निसर्ग!!!अहाहा, सगळे कसे एकदम ओके..."**

 सोबत आणलेल्या नाश्ता /खाऊ याची मजा घेत , गप्पागोष्टी करत,  पत्त्यांचा डाव इत्यादी मध्ये दिवस कधी मावळला ते कळालेही नाही.  सकाळी सात वाजता गाडी त्रिशूर येथे पोहोचणार असल्याने अखी रात्र गाडीतच काढावयाची होती. त्यामुळे पुन्हा एकदा सगळे निद्राधीन झाले...

टिप्पण्या

  1. अश्या सुंदर प्रवासाचा योग कधी येतो कुणास ठाउक.... प्रवासच इतकं छान वर्णन म्हणजे "मंजिल से भी प्यारे लगणे लगे हैं ये रास्ते.

    उत्तर द्याहटवा
  2. संपुर्ण वाचत असताना परत प्रवासात आहे अशी भावना निर्माण होते सर्व आठवते
    मस्त विलास
    केदारनाथ यात्रेचे असेच वर्णन कर आम्ही तुला मदत करतो

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर