नियोजन - आमची दक्षिण भारत यात्रा...

 *आमची दक्षिण भारत यात्रा नियोजन ...

मागे उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही मे 22 मध्ये उत्तराखंड येथील चारधाम यात्रा करून आलो होतो. ऑक्टोबर मध्ये दुसरे धाम म्हणून श्रीक्षेत्र रामेश्वर या ठिकाणास भेट व केरळ, कन्याकुमारी, दक्षिण भारत दर्शन असे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मागील अनुभवावरून सर्वांचे आधार कार्ड, पॅन कार्ड इ. कागदपत्रांची जमवाजमव करून नियोजन ठरले. दिनांक 7 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर असा हा दौरा ठरला. पहिल्या यात्रा ग्रुप मधील दोन जोड्या रद्द झाल्याने नवीन सभासद शोधणे आले. जुन्यापैकी मी म्हणजे विलास घोलप,  राजेंद्रजी पोतदार, जयरामजी गांगुर्डे, बाळासाहेब कोठुळे हे आणि नवीन सदस्यांपैकी धनंजयजी वाड, शिवाजीराव ताजनपुरे, बाळासाहेब कोठुळे यांचे साडू दिंडोरीचे श्री संपतराव जाधव,  सांख्यिकी अधिकारी श्री राजेंद्रजी सूर्यवंशी आणि नरेशजी बोरसे अशा नऊ जोड्या आणि टूर मॅनेजर श्री अरुणजी सूर्यवंशी काका असे एकूण 19 जण नक्की झाले.  जाताना केरळ मधील कोचीपर्यंत रेल्वेने व परतीला मदुराई हुन मुंबईपर्यंत विमानाने यायचे असे ठरले. गौरवदादाने लगोलग रिझर्वेशन ची औपचारिकता देखील पूर्ण करण्यात केली. दिनांक सहा ऑक्टोबरला रात्री म्हणजेच सात ऑक्टोबरच्या पहाटे अडीच ला नाशिक रोड होऊन प्रवास सुरूवात होणार होता उत्तराखंड दौऱ्याच्या तुलनेत या ट्रिपचा भाग संपूर्ण सपाटी नसला तरी बऱ्यापैकी सोपा होता. वातावरण देखील सामान्य असल्यामुळे केदारनाथ यात्रे एवढी तयारी करायची नव्हती.  मागच्या अनुभवातूनच सगळे शिकले होते.  पुरुषांवर पुरेसा विश्वास नसल्यामुळे वाड वहिनींनी लगेच स्त्रियांचा एक स्वतंत्र ग्रुप बनवला.  त्यानुसार एकमेकांशी चर्चा करत,  एकमेकीला व्हिडिओ कॉल करून मी काय काय घेतले,  तू काय घेणार  इत्यादी इत्यादी इत्यादी ...आशा प्रकारे सामानाची जुळवाजुळव व बांधा बांध करून सगळे तयार झाले. यावेळी प्रकर्षाने जेष्ठ रंगकर्मी प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे यांच्या वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाची पदोपदी आठवण येत होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर