सातवा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 सातवा दिवस - 11/2/23


पहाटे 3 च्या दरम्यान डहाणू स्टेशन येणार असल्याने निश्चिन्त झोपण्याचा प्रश्नच नव्हता, 2 वाजताच उठून आपापल्या बॅगा व सामान सांभाळत, दरवाजात एकमेकाला सावरत सगळे स्टेशनची वाट पाहत होतो, अंधार वेगाने चिरत पहाटे 3.30 ला, गाडी डहाणूला आम्हाला उतरवून पुढे मुंबई ला रवाना झाली अन महत्वाचा टप्पा पार पडला. 

टाटा ...

धन्यवाद रेल्वे, आम्हाला वेळेत आणि सुखरूप पोहोचवण्या बद्दल....

आम्हाला घेण्यासाठी नाशिक हुन गाडी आलेलीच होती. लगेच तिच्यात बसून नाशिकसाठी प्रयाण केले. काही डुलकी घेत, काही गप्पा मारत, यात्रेतील आठवणींमध्ये गुंगले होते, काही मनाने केंव्हाच घरी पोहोचले होते. रस्त्यात एके ठिकाणी पहाटेचा चहा घेत, रस्त्याने गाडीतुन च त्रिंबकेश्वर महाराजांचे दर्शन घेत असताना सुर्यादेवानेही दिलेले दर्शन सर्वाना आनंदित करून गेले,. आपल्या शहरात, आपल्या मातीत पाऊल ठेवण्याचा आनंद वेगळाच, त्याबरोबर आपल्याला घेण्यासाठी कोणीतरी आले ही अनुभूती देखील सुखावणारी होती. सर्वांनी पुन्हा लवकर भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकांचा निरोप घेतला...

अशा रीतीने बहुप्रतिक्षित अशी यात्रा यशस्वी पार पडली...

या यात्रेविषयी आमच्या संयोजिका सौ शुभांगी सूर्यवंशी मॅडम यांनी त्यांचे विचार पुढील शब्दात विशद केले..

*नमस्कार*

मी सौ. शुभांगी अरुण सूर्यवंशी मातोश्री ट्रॅव्हल्स आणि मातोश्री हॉलिडेज या परिवारातर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सोमनाथ, द्वारका, बेट द्वारका, पोरबंदर, शिवराजपुर बिच, आणि गिरणार दर्शन ही सहल अतिशय चांगल्या रीतीने आम्हाला पार पाडता आली. 

       मी आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रथमच भेटले. परंतु मला असे जाणवले नाही की, आपण यापूर्वी भेटलेलो नाही. या सहलीमुळे मला खुप सार्‍या नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि मी काल सांगितले त्याप्रमाणे मातोश्री परिवाराच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ झाली. आपल्यासोबत ही सहल करताना मला तसेच आपल्या सर्व मातोश्री परिवाराला अतिशय आनंद झाला. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.

      ही सहल माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय आहे. कारण माझे येणे जवळजवळ अशक्य असताना, आजवर कधीही न घडलेली गोष्ट घडली व हायकोर्टने आपली इन्स्पेक्शनची ऑर्डर बदलली, हा एक खरोखर दैवी चमत्कार आहे. दत्त महाराजांचे पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर माझी काय अवस्था होती हे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. तुम्हा सर्वांच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे हायकोर्टाला इन्स्पेक्शन ची तारीख बदलणे भाग पडले यासाठी मी तुमच्या सर्वांची कायम ऋणी राहील. 

      मी तुम्हा सर्वांना खात्रीपूर्वक सांगते की, या पुढची आपली सहल ही अजून जास्त आनंददायी व चांगली करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.*

 धन्यवाद🙏*

🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर