पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Letter to Jt. CP Pune

माननीय श्री कर्णिक साहेब  सह पोलीस आयुक्त पुणे. माझी कन्या कै. हर्षदा हर्षल वाणी हीचा 14 एप्रिल रोजी पुणे येथे दुर्देवी मृत्यू झाला. त्या घटनेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही आपणास भेटलो होतो. कन्येच्या मृत्यूने कोलमडून गेलेल्या आमच्या कुटुंबाला कोणाच्यातरी मानसिक आधाराची गरज होती. आपली भेट झाल्यामुळे व आपण दिलेल्या धीरोदात्त पाठिंब्याने आम्हास खूप आधार मिळाला, खूप हायसे वाटले आणि जर खरोखरच हर्षदाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघात किंवा घातपाताने घडवलेला असेल तर अपराध्याला नक्कीच शिक्षा होऊन आमच्या दुर्दैवी कन्येस न्याय मिळेल ही आशा वाटली.  तिचा मृत्यू जर नैसर्गिक असेल तर सर्वच थांबते. मग ते फक्त आमचे दुर्दैव असे म्हणून शांत बसावं लागेल पण ते तसे  नसेल तर कृपया आपणा मार्फत आम्हाला न्याय मिळण्यासाठी नक्कीच योग्य ते पावले उचलले जातील ही खात्री आहे.  अशी शंका मनात येण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत त्या आपणाशी शेअर कराव्या असे वाटते त्या त्यापुढील प्रमाणे... 1.  हर्षदा. वय वर्ष ३०, खूपच सडपातळ, कोणताही आजार, किंवा Health problem नाही.  के के वाघ इंजीनियरिंग कॉलेज नाशिक येथून बीई आणि त

11-12. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - अकरावा-बारावा दिवस - 14-15/5/22

इमेज
  आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा  दि. १४-१५/५/२२  दिवस  - अकरावा-बारावा   14.5.22 यात्रेच्या नियोजनाप्रमाणे आजचा दिवस हरिद्वार येथील मुक्काम व उद्या निघून दिल्ली मार्गे नाशिकला प्रयाण असा होता., परंतु हरिद्वार येथे फक्त मनसादेवी व चंडी देवी ही दोनच ठिकाणी बघावयाची असल्यामुळे बराचसा वेळ हाती राहणार होता, त्यामुळे आम्ही दुपारपर्यंत ही दोन्ही स्थळे करून, मुक्कामासाठी दिल्लीची निवड केली, जेणेकरून, उद्या दुपारपर्यंत होईल तेवढे दिल्ली दर्शन करता येईल. त्याप्रमाणे नियोजन केले.  हरिद्वार येथील गंगा घाटावरील आरती पहिल्या दिवशीच झाली होती. त्यामुळे आकर्षण असलेले मनसादेवी मंदिर पाहण्यास गेलो.  हे मंदिर हिमालयाच्या दक्षिणेकडील पर्वत शृंखला असलेल्या शिवालिक टेकड्यांवर बिल्व पर्वतावर स्थित आहे . हे बिल्व तीर्थ म्हणून ओळखले जाते.  शिवाची मनुष्य रूपातील मानसकन्या माता मनसा देवी हिच्या दर्शनाने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात., अशी मान्यता आहे.  उंच पर्वतावर वसलेल्या मातेच्या या मंदिरासाठी पायऱ्यांसोबतच रोपवेची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. अनेक भक्त येथे आल्यावर आपली इच्छा व्यक्त करून  येथील झ

10. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - दहावा दिवस - 13/5/22

इमेज
  आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. १३/५/२२ दिवस  - दहावा   आजचा प्रवास हा श्रीनगर (रुद्रप्रयाग) ते ऋषिकेश असा दीडशे किलोमीटरचा होता. सुरुवातीलाच श्रीनगर येथील हॉटेल उर्वशीला टाटा करून, येथील स्थानिक स्वयंभू श्री सिद्धटेक  कमलेश्वर महादेवाचे  मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघालो.  संपूर्ण रस्त्याने गंगेची सोबत असते. गंगा नदीच्या खोल व  रुंद पात्रामुळे येथे राफ्टिंग (साहसी नौकानयन) या खेळाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला दिसतो. गंगेच्या किनारी अनेक ठिकाणी याचे केंद्र उभारलेले दिसतात. अनेक साहसी प्रशिक्षित व शिकाऊ जलतरणपटू आपले कौशल्य आजमावित व  प्रशिक्षण घेत असतात.  दुपारच्या सुमारास ऋषिकेश ला पोहोचलो. येथे  तापमानातील फरक लगेच जाणवतो. गेले दहा दिवस आम्ही हिमालयात अतिशय थंड वातावरणात होतो, मात्र येथे आल्याबरोबर तापमान 35 - 40 अंशापर्यंत गेल्याचे जाणवते. हॉटेलमध्ये पोहोचून फ्रेश होऊन लगेच गंगेकिनारी गेलो. तिथून बोटीने गंगा नदी पार करून, पल्याड तीरावरील गीता मंदिर, विष्णू मंदिर इत्यादी प्राचीन मंदिरे व धार्मिक ठिकाणे बघितली. येताना बोटी ऐवजी राम झुल्यावरून परत आलो. येथून लक्ष्मण झुला चार

9. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - नववा दिवस - 12/5/22

इमेज
  आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. १२/५/२२ दिवस  - नववा   बद्रीनाथ हे  उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील एक शहर आणि नगर पंचायत आहे . हिंदूचे सर्वात पवित्र स्थान, आणि भारताच्या चारधाम तीर्थक्षेत्रांच्या चार स्थळांपैकी एक आहे. हे शहर नीलकंठ शिखराच्या जवळ नर आणि नारायण पर्वत रांगांच्या मध्ये आहे. सकाळी लवकर उठून, आवरून लगेच दर्शनाला गेलो तर दर्शन लवकर मिळेल असा आमचा कयास होता. त्या दृष्टीने आम्ही सकाळी सात वाजताच मंदिराजवळ पोहोचलो देखील. परंतु तिथे पाहतो तो काय,  जवळपास दीड किलोमीटरची लाईन लागलेली होती. नाईलाज होता. लाईनला शेवटी जाऊन उभा राहिलो.  आम्ही अशा उंचीवर होतो की हात वर केला तर सहज आभाळाला लागेल असा आभास व्हावा. आजूबाजूला सर्व बाजूंनी उंच पर्वतरांगा, त्यावर पसरलेला बर्फ आणि सूर्याच्या किरणात त्याची दिसणारी चमक.. मधूनच येणारे धुके, अतिशय विलोभनीय दृश्य होते हे. वातावरणातील गारवा आणि भाविकांचा सतत चाललेला देवाच्या नावाचा जयजयकार अशा उत्साहवर्धक आणि पवित्र वातावरणात भारून गेल्यासारखेच होत होते.  खरोखर धरतीवरील स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.. याची प्रत्यक्ष अनुभूती येत होती. असे म्

8. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - आठवा दिवस - 11/5/22

इमेज
  आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. ११/५/२२ दिवस  - आठवा   मागील   लेखात उल्लेख केल्याप्रमाणे  पंच केदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर , भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी मानला जातो. आता आमचे शेवटचे उद्दिष्ट तेच आहे.  आजचा दिवस हा बद्रीनाथ पर्यंतचा 180 किमी चा केवळ प्रवास असणार आहे. कालचा थकवा, जागरण यामुळे आज निवांतपणे सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रवासास सुरवात केली. कालच्या थरारक यात्रेविषयी किती अन काय सांगू असे प्रत्येकाला झाले होते. आपले अनुभव इतरांना सांगण्यासाठी प्रत्येक जण आतूर होता.  पुढे  गुप्तकाशी  जवळ  उखीमठ (ओखीमठ) हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक लहान शहर  आणि हिंदू  तीर्थक्षेत्र आहे.  हिवाळ्यात, केदारनाथ मंदिर आणि मध्यमहेश्वर मंदिरातील मूर्ती उखीमठ येथे आणल्या जातात आणि सहा महिने येथे पूजा केली जाते . बाणासुराची मुलगी उषा आणि  भगवान  कृष्णाचा  नातू   अनिरुद्ध    यांचा  विवाह येथे पार पडला.  उषाच्या नावावरून या जागेला उषामठ असे नाव पडले, जे आता उखीमठ म्हणून ओळखले जाते.  हिवाळ्यात, केदारनाथ आणि मध्यमहेश्वर

7. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - सातवा दिवस - 10/5/22

इमेज
  आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. १०/५/२२ दिवस - सातवा   मागील   लेखात लिहिल्याप्रमाणे उत्तराखंड येथील चारधाम पैकी यमुनोत्री व केदारनाथ या दोन स्थळांना भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारे वाहनाची सोय नाही. येथे पायी अगर खेचरावरच जावे लागते. केदारनाथ  साठी हेलिकॉप्टर सेवा आहे, पण ती पूर्णपणे वातावरणावर अवलंबून असते.  आम्हाला शेवटपर्यंत हेलिकॉप्टर सेवा न मिळाल्याने आम्ही पहाटे 3 ला निघून सोनप्रयाग पर्यंत आमची गाडी, तेथून स्थानिक जीपने गौरीकुंडा पर्यंत पोहोचलो. येथे पुन्हा काठ्या खरेदी केल्या. (या काठ्यांचा मोठा किस्सा आहे, पण तो नंतर केंव्हा तरी). गर्दी एवढी होती की तुमची एकमेकांपासून ताटातूट होतेच. तरीही आम्ही दोन ग्रुप मध्ये एकत्र राहू शकलो. गौरीकुंडाला पोहोचेपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते, तरीही खूप उजेड पडलेला होता. येथे गरम पाण्याचे कुंड आहे. त्यात आंघोळी उरकल्या. येथे आम्हाला श्रीरामपूर येथील सैन्य दलातील जवानांचा एक ग्रुप भेटला. दुर्दैवाने गौरीकुंडावरच त्यांच्यापैकी एकाची पँट चोरीला जाऊन पंधरा-वीस हजाराचे नुकसान झाले. असो गर्दी आली की चोर आलेच. त्यांना तर ही सुवर्णसंधी.  आवरून

6. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - सहावा दिवस - 9/5/22

इमेज
  आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. ९/५/२२ दिवस - सहावा काल गंगोत्री चे दर्शन आटोपल्यानंतर आजचा दिवस हा केदारनाथच्या दिशेने उत्तर काशी ते गुप्तकाशी असा केवळ प्रवासाचाच होता. उत्तर काशी शहर सोडताना नदीकाठी दोन्ही बाजूने डोंगरउतारावर वसलेले हे विस्तीर्ण पसरलेले शहर आपले खरे रुपडे दाखवते.   विशेषतः बैठ्या आकाराचे किंवा जास्तीत जास्त 2 ते 3 मजली उंच व लांबच लांब आकाराच्या रंगीत इमारती. जवळपास सर्व घरांना रंग दिलेला दिसतो. त्यामुळे नजारा अतिशय खुलून दिसतो. आजूबाजूचे वातावरण देखील या सौन्दर्यामध्ये भर घालते.  डोंगर रांगा, त्याच्या उतारावर झाडी, झाडांमध्ये घरे, त्याही खाली नदीचे झुळझुळ वाहणारे पाणी अतिशय मनोहारी दृश्य. काय निसर्गाची किमया आहे !!! जबरदस्त !!! थोडे पुढे गेल्यानंतर डोंगर उतारांवरच शेती केलेली दिसते. येथे पर्वतीय प्रदेशामुळे शेतीला विस्तीर्ण असे क्षेत्र नाही. डोंगर उतारावरच थोड्या थोड्या अंतरावर बांध घालून शेती केली जाते. ही बांधाची शेते देखील दुरून खूपच सुंदर दिसतात.  चमीयाला, चिरबटीया, तीलवाडा (रुद्रप्रयाग) अशी गावे पार करीत आम्ही सायंकाळी मुक्कामी पोहोचलो. येथेही अव्यवस्थ

4. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - चौथा दिवस - 7/5/22

इमेज
  आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा  दि. ७/५/२२  (दिवस - चौथा) बारकोटहुन गंगोत्री ला जाण्यासाठी उत्तर काशी मार्गे जावे लागते. अतिशय अवघड रस्ता असल्यामुळे रस्त्यात उत्तरकाशी येथे मुक्काम करावा लागतो. आम्हीही सकाळी लवकर उठून ताजेतवाने होऊन उत्तरकाशीसाठी रवाना झालो. त्या अगोदर बारकोट येथील हॉटेलच्या गच्चीमध्ये उभे राहिल्यावर जे नयनरम्य दृश्य समोर दिसत होते ते खरोखर अवर्णनीय असेच होते. निसर्गाने भरभरून आपले दान यांच्या पदरात दिले आहे. जिकडे पहावे तिकडे मोठमोठे डोंगर, त्यावर पसरलेली उंच उंच झाडांची प्रचंड वृक्षराजी.  रस्त्याने लागणाऱ्या अशाच अनेक ठिकाणांचा आनंद घेत, फोटोग्राफी करत प्रवास चालला होता. ड्रायव्हर ने राजमार्ग सोडून एक शॉर्टकट्ने  गाडी घेतली होती. रस्ता अत्यंत अवघड, वळणावळणाचा, ओबडधोबड होता, जर गाडीचे टायर पंचर झाले तर दूर दूर पर्यंत कोणतीही मदत मिळणे अवघड,. आम्ही तर जीव मुठीत घेऊनच बसलो होतो. रस्त्यात एका उंचशा ठिकाणी एक छोटीशी वस्ती वजा गाव होते. तेथे नवनाथांपैकी मिननाथांचे मंदिर पाहून व तेथील दर्शन घेतल्यावर खूप हायसे वाटले. जिवात जीव आल्यासारखे वाटले. येथे टोप्या, शॉल, इ. थो