Letter to Jt. CP Pune
माननीय श्री कर्णिक साहेब
सह पोलीस आयुक्त पुणे.
माझी कन्या कै. हर्षदा हर्षल वाणी हीचा 14 एप्रिल रोजी पुणे येथे दुर्देवी मृत्यू झाला. त्या घटनेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही आपणास भेटलो होतो. कन्येच्या मृत्यूने कोलमडून गेलेल्या आमच्या कुटुंबाला कोणाच्यातरी मानसिक आधाराची गरज होती. आपली भेट झाल्यामुळे व आपण दिलेल्या धीरोदात्त पाठिंब्याने आम्हास खूप आधार मिळाला, खूप हायसे वाटले आणि जर खरोखरच हर्षदाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघात किंवा घातपाताने घडवलेला असेल तर अपराध्याला नक्कीच शिक्षा होऊन आमच्या दुर्दैवी कन्येस न्याय मिळेल ही आशा वाटली.
तिचा मृत्यू जर नैसर्गिक असेल तर सर्वच थांबते. मग ते फक्त आमचे दुर्दैव असे म्हणून शांत बसावं लागेल पण ते तसे नसेल तर कृपया आपणा मार्फत आम्हाला न्याय मिळण्यासाठी नक्कीच योग्य ते पावले उचलले जातील ही खात्री आहे.
अशी शंका मनात येण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत त्या आपणाशी शेअर कराव्या असे वाटते त्या त्यापुढील प्रमाणे...
1. हर्षदा. वय वर्ष ३०, खूपच सडपातळ, कोणताही आजार, किंवा Health problem नाही. के के वाघ इंजीनियरिंग कॉलेज नाशिक येथून बीई आणि त्यानंतर पॉवर सिस्टीम मध्ये एम.ई. केल्यानंतर , सुरत (गुजरात) येथील पॉवर ग्रिड इंटिग्रेशन येथे Ph.D करण्यासाठी गेली होती. 5 वर्षांच्या आता शेवटच्या टप्प्यात म्हणजे 2 महिन्यात तिला Ph. D. पदवी मिळणार होती. अशी तिची विलक्षण शेक्षणिक पार्श्वभूमी.
लग्न होऊन जवळपास पाच वर्ष होत आली, हर्षदा ही आपल्या पीएचडीच्या अभ्यासानिमित्त सुरत येथेच होती. कोणीही नवीन लग्न झालेला व्यक्ती आपल्या जोडीदाराला भेटण्यासाठी प्रयत्न करतात, मग तो कितीही का दूर असेना. परंतु या केस मध्ये श्री हर्षल हे पाच वर्षात आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेल्याचे किंवा तशी आतुरता दाखवल्याचे दिसून आले नाही.
2. हर्षलचे (हर्षदाचे पती) व त्यांच्या आई-वडिलांचे आपसात वारंवार खटके उडत असत व त्याचे खापर हे पीएचडी साठी सुरत येथे राहत असलेल्या हर्षदा वर फोडले जायचे असे समजले होते. "आम्हाला वंशाला दिवा हवा आहे, या शिकलेल्या मुली पेक्षा एखादी आदिवासी मुलगी करून आणली असती तरी चालले असते" अशा शब्दात त्यांनी हर्षलला सुनावल्याचे हर्षदा मार्फत आमच्या कानावर आले होते व या परिस्थितीला केवळ हर्षदाच कारणीभूत आहे असे हर्षल चे मत झाल्यामुळे या द्विधा मानसिक परिस्थितीत हर्षलने, हर्षदाचा अडसर कायमचा दूर करावयाचे ठरवले असेल अशी शंका येते.
3. हर्षदा पीएचडी संपवून पुणे येथे राहायला आल्यावर लगेच दोन महिन्यातच सासू-सासर्यांनी या दोघांना शेजारच्या बिल्डिंगमध्ये वेगळा फ्लॅट घेवून राहण्यास सांगितले. त्या घरात जाऊन दोन ते तीन आठवडे देखील झाले नाही तोच सासू-सासरे आठ दिवसासाठी नैनिताल येथे फिरण्यासाठी गेले, जाण्याच्या दोन दिवस अगोदरच सासूबाईंनी त्यांच्या ओळखीतली कामवाली बाई यांच्या साठी नियुक्त केली होती. या फ्लॅटमध्ये हर्षल ने नवीन गॅस गिझर बसवून घेतले. एम एन जी एल यांच्याकडून बाथरूम मध्ये गॅस गिझर बसवण्याची परवानगी नसताना देखील बेकायदेशीरपणे सदर कनेक्शन जोडले. वरवर पाहता या गोष्टी साधारण वाटत असल्या तरीही एखाद्या नियोजनाचा भाग वाटतो. त्या व्यक्तीद्वारे गिझर मध्ये दोष ठेवून त्याद्वारे अपघात घडविण्याची दाट शक्यता वाटते. आम्ही तिघेही घरी नसतांना हा अपघात घडला असे भासवण्यासाठी हे नियोजन असू शकते.
त्यासाठी सदर गॅस गिझर बसवणारा श्री अतुल पाटील याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे कारण तो प्रत्येक वेळेस वेगवेगळे विधाने करतो आहे.
4. श्री हर्षल वाणी - पती आणि अनिल वाणी - वैशाली वाणी या सासू-सासर्यांनी हर्षदा च्या नावे इन्शुरन्स काढून त्यासाठी देखील हर्षदाचा घातपात घडून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हर्षदा च्या नावे अशा काही पॉलिसी काढल्या आहेत का याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे
5. घटनेच्या दिवशी म्हणजे 14 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान कामवाल्या बाईला घरात खाली येऊन जाण्याचे कारण काय ? त्याचप्रमाणे साडेअकरा वाजता घरात दोन बायका असल्याचे तो डिलिव्हरी बॉय सांगतो हे विसंगत वाटते. हर्षल ला विचारल्यावर 14 एप्रिल च्या त्याच्या दिवसभरातील कार्यक्रमाचे वर्णन प्रत्येक वेळेस वेगवेगळे सांगत आहे, त्यात प्रत्येक वेळेस विसंगती आढळून येते.
हर्षदा चे मोबाईल वरील 12. 51 चा मिस कॉल, 12 .29 ला डिलिव्हरी घेतल्याचा मेसेज, 1.10 ला अनिल वाणी यांचे दोन मिस कॉल व 2.30 वाजता पुन्हा दोन मिस कॉल हे सर्व काहीतरी वेगळे दर्शवतात असे वाटते. या पूर्ण आठवडाभरात हर्षल वाणी, अनिल वाणी, वैशाली वाणी या सर्वांचे, त्याचप्रमाणे कामवाली बाई, गॅस गिझर मेकॅनिक आणि हर्षल ची मैत्रीण यांचे कॉल रेकॉर्ड काढून तपास केला तर नक्कीच काहीतरी सुसंगत घटना समोर येईल.
6. सायंकाळी 7:14 वाजता हर्षल वाणी घरी आल्याचे सांगतात व मदतनिसाच्या सहाय्याने दरवाजा तोडून हर्षदा ला मृतावस्थेत बाहेर काढले असे त्यांनी म्हटले आहे. अशावेळी दरवाजा तोडण्या अगोदर शेजारीपाजारी किंवा पोलीस यांना माहिती देऊन त्यांच्या समक्ष अशा गोष्टी होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे हर्षल घरात आल्यावर घराला लॅच लावलेले होते , त्याने स्वतःच्या चावीने लॅच उघडून आत आला व बाथरूमच्या दरवाजाला आतून कडी लावलेली असल्याचे सांगतो. यात कुठेतरी विसंगती वाटते. हर्षदा बाथरूमला जाण्या अगोदर बाहेरच्या दरवाजाला कडी न लावता केवळ बाथरूम च्या दरवाजाला आतून कडी लावेल हे अशक्य वाटते.
7. 14 एप्रिल ते 20 एप्रिल या 8 दिवसातील श्री हर्षल वाणी किंवा हर्षल इंटरप्राईजेस यांचे बँकेतील व्यवहार तपासणी अपेक्षित आह त्यातही काही धागा दोरा मिळू शकतो.
8. डिलिव्हरी देण्यासाठी आलेली व्यक्ती हर्षदा च्या फोनवर कॉल करतात, वारंवार फोन करूनही उचलल्या न गेल्यामुळे ते पर्यायी फोन म्हणून सासूबाईंच्या फोनवर फोन करतात. सासुबाई देखील हर्षदा चा फोन उचलला जात नाही म्हणून मुलाला फोन करतात व असे असून देखील कामात असेल, ती फोन उचलत नाही असे अगदी सहजतेने घेऊन हर्षलने त्वरित घरी न जाता किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी न करता सायंकाळपर्यंत घरी जाणे टाळले या गोष्टी नक्कीच संशयास्पद आहेत
9. दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेले असूनही Career ला महत्त्व देऊन मोठ्या जिद्दीने PhD संपवून आता संसाराला सुरुवात करू म्हणून एका नवीन घरात तिने तिचा संसार थाटायला आणि सजवायला सुरुवात केली होती. त्याच घराच्या सुशोभीकरणासाठी Amazon वरून मागवलेले साहित्य ती स्विकारू शकली नाही... यात तिची आपल्या घराविषयीची ओढ प्रकर्षाने दिसते.
तिचे वैयक्तिक आयुष्य - आपण Ph.D. संपवून मगच बाकी सर्व साध्य करू अशा खंबीर निर्धाराने, मोठ्या आवेशात तिने अभ्यासाला सुरवात केली होती. संपूर्ण Covid काळ सुध्दा तिने हॉस्टेललाच राहून Phd ची तपश्चर्या अखंड सुरू ठेवली. हॉस्टेलला मोजून 7 मूली, ज्या बंद मुळे घरी जाऊ शकत नव्हत्या, त्यांच्यासोबत कोविड काळात तिने आपला अभ्यासक्रम चालूच ठेवला. बोलके व्यक्तिमत्व, easy going nature, जिवाला जीव देणारी व्यक्ती म्हणून ख्याती असलेली हर्षदा, तिच्यासाठी संपूर्ण हॉस्टेलच तिचे कुटुंब होते. त्यामुळे ती सामाजिक भान असलेली व सर्वांशी मिळून मिसळून वागणारी होती हेच स्पष्ट होते.
तरी कृपया वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक व मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार व्हावा आणि योग्य त्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून जर खरोखर कोणी दोषी असेल तर त्यास निश्चित शिक्षा व्हावी व कै. हर्षदास न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे.
धन्यवाद
दुर्दैवी पिता,
मधुकर नेरकर....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा