श्री जगन्नाथ पुरी यात्रा - समारोप
आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा - श्री जगन्नाथ पुरी यात्रा - समारोप दिवस 10 - दि. 14.12.2023 काल यात्रेच्या शेवटच्या दिवसाचे प्रवास वर्णन लिहिले असले तरी, समारोपाशिवाय प्रवास वर्णन पुरे होऊ शकणार नाही,. म्हणून आजचा हा लेखन प्रपंच .. काल प्रयाग येथील संगमावरचे स्नान, मंदिर दर्शन इत्यादी गोष्टी झाल्यानंतर आम्हाला वेध लागले होते ते आजच्या परतीच्या विमान प्रवासाचे. विमान प्रवासात प्रत्येकाला केवळ 22 किलो पर्यंतच्या सामानाची मर्यादा असल्यामुळे खरेदी केलेले सामान बॅगेसह वजनाच्या मर्यादित कसे बसवायचे याचे... सकाळी उठल्याबरोबर हॉटेलमध्ये असलेल्या वजन काट्यावर आपापल्या बॅगांचे वजन करीत, इकडचे सामान तिकडे, तिकडचे इकडे असे करत, काही अनावश्यक काढून टाकत सगळ्यांनी बॅगा भरल्या आणि दहा वाजता मी विमानतळाकडे कूच केले. एक वाजेचे विमान तीन वाजता आले. एवढा वेळ विमानतळावरच बसून इकडे तिकडे टाइमपास करणे एवढेच आमच्या हातात होते. जे काही थोडेफार खाऊचे पुडे उरले होते ते फस्त करत वेळ काढत होतो. विमानतळावरच अर्धा पाऊण तासाच्या छोटेखानी कार्यक्रमात सर्वांनीच यात्रेविषयी चे आपले अनुभव क