कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मानवी जीवनास स्पर्श....

  Artificial Intelligence चा मानवी जीवनाला स्पर्श...

रोटरी क्लब ऑफ नासिक स्मार्ट सिटी यांचे मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेत आमच्या वहिनी सौ दीपाली लीलावती निवृत्ती रायते-महाजन यांनी पारितोषिक पटकावले.  नाशिकमधील हॉटेल Emerald park येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.... विषय होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मानवी जीवनास  स्पर्श.... 

आपल्या माहितीस्तव सदर निबंध लेखकाची परवानगी घेऊन केवळ ज्ञान वृद्धी साठी देत आहे... 


मानवाला अन्य सजीवांपासून संपूर्ण ब्रम्हांडात वेगळा ठरविणारा एकमेव शब्द म्हणजे  "बुद्धिमत्ता".  मानवाला बुद्धिमत्ता, बौद्धिक क्षमता, अंदाज क्षमता, तर्कशक्ती आणि विश्लेषणाच्या ताकदीवरच जग जिंकण शक्य झालं आहे... 

परंतु 'आता 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजेच 'Artificial Intelligence' असलेले मानवनिर्मित संगणक आणि यंत्रमानव, मानवाशीच स्पर्धा करू लागले आहेत. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनालाच स्पर्श करू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची की दुनिया रहस्यमयी, अद्भूत आहे.

 'Artifical Intelligence' हे मानवाच्या अचाट कल्पनाशक्तीचे व सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेचे एक मोठे यश आहे..

'Artifical Intelligence' चा इतिहास आपण बघितला तर सन १८५६ मध्ये अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' हा शब्द सर्वप्रथम डार्टमाऊथ परिषदेत स्विकारला. यानंतर १९७२ मध्ये या कृत्रिम तंत्रज्ञानाचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून जपान मध्ये पहिला रोबोट बनविला गेला. त्याला 'WABOT-1' या नावाने ओळखले गेले. परंतु त्यानंतर काही काळ या "AI system" चा  प्रभाव कमी होत गेला. १९८० साली पुन्हा expert system च्या साहाय्याने AI ने पुन्हा प्रगती करण्यास सुरुवात केली.  याच काळात American Association ची 'Standard  University' येथे AI याच विषयावर पहिली कॉन्फरन्स झाली.  यानंतर मात्र AI ची बरीचशी प्रगती होत गेली आज Google, Facebook, IBM, Amazon यांसारख्या बऱ्याच मोठमोठया कंपन्या या AI system चा वापर करून आश्चर्यकारक उत्पादने तयार करत आहेत.

Artifical Intelligence'  हे एक संगणक विज्ञानाचेच क्षेत्र आहे, जे मशिनच्या विकासावर लक्ष केंद्रित करते.  ज्याला मानवी बुद्धीची आवश्यकता असते., दृष्यधारणा, उच्चार ओळखणे, निर्णय घेणे, भाषांतर करणे अशा वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट केले जाते. आपण संगणक वापरत असतांना एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला कमांड दयावी लागते. परंतू artifical intelligence च्या साहाय्याने बनविलेल्या मशिनला कमांड दयावी लागत नाही. ते स्वतःच निर्णय घेऊन कमांड देऊन कार्य पूर्ण करत असते.

Artificial Intelligence चे अनेक प्रकार आहेत.

उदा. Reactive AI, Limited Memory AI, Machine Learning AI, Deep Learning AI, Natural Language Processing AI, Robotics AI. 

Artificial Intelligence हे विविध क्षेत्रांमध्ये स्वयंचलित कार्य करण्यासाठी, निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी वापरण्यात येते. कृषीक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, उद्योग-व्यापार आरोग्य अशा बऱ्याच क्षेत्रात याचा वापर केला जातो. रोजच्या व्यवहारात, दैनंदिन कामांमध्ये ही AI चा मोठ्या प्रमाणात वापर होतांना दिसून येतो. उदा. Personal Assistant, Siri, Alexa, Google Assistance यांसारखे AI प्रणालीचे Personal assistants म्हणून आपले रिमांइडर सेट करणे, अपॉइंटमेंट सेट करणे, प्रश्नांची उत्तरे देणे इत्यादी कामात मदत करत असतात. 

Google map हे Navigation App. रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी AI प्रणालीच आहे. तसेच Banking क्षेत्रात Fraud Transaction ओळखण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. ग्राहकाला तत्पर सेवा देण्यासाठी AI Powered chatbox व  virtual assistance चा वापर ग्राहक सेवेमध्ये केला जातो. आरोग्य क्षेत्रातही रोगाचे निदान करण्यासाठी व उपचाराचे योग्य नियोजन करण्यासाठी या AI प्रणालीचा वापर केला जातो. Social Media मध्ये AI अलगोरीदम बातम्या feed करण्यासाठी, कंटेट ची शिफारस करण्यासाठी, हानिकारक कंटेट शोधून काढण्यासाठी देखील या Artifical Intelligence' चा वापर केला जातो.

दैनंदिन जिवनात वापरल्या जाणाऱ्या smartphones मधील  Applications  हे देखील  Artifical Intelligence' चेच उदाहरण आहे. Google Lens, AI camera, chatbox इ. तसेच आवाज ओळखणे, चेहरा ओळखणे यासाठी ही याचा वापर केला जातो.

अनेक कंपन्यामध्ये employees ची ओळख पटवून घेण्यासाठी या AI प्रणालीचा वापर केलेला दिसतो. तसेच online कंपन्या, IT कंपन्या देखील ग्राहकांना AI च्या मार्फत उत्तम सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिंक्स, online frauds इ. अनेक गोष्टींवर नियंत्रण आणता येऊ शकते. तसेच online data, Files सुरक्षित ठेवण्यासाठीही याचा वापर केला जातो.

माहीतीच्या महाजालात म्हणजेच internet व software ला  smart decision support system (SDSS) म्हणून रुग्णालयात या AI तंत्रज्ञान प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे.  तसेच हवामान आणि अवकाशशास्त्र वाहन उद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, वीजनिर्मिती, दळणवळण व हवाई वाहतूक, बंदरांमध्ये जहाजांची ये-जा देखरेखी साठी, खाणकामात, औषधनिर्मिती मध्ये, शिक्षणक्षेत्रामध्ये, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती मध्येही या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे.  ही technology मानवी त्रुटी, चुका कमी करून अचूकता वाढवत असल्याने वैद्यकिय क्षेत्रात याचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात करतांना आपल्याला दिसून येईल. 

'Smart Home' ह्याद्वारे घरातील TV, washing machine, वातानुकुलित मशीन किंवा घरातील दरवाजे, खिडक्या सुद्धा हया AI प्रणालीद्वारे संचलित केले जात आहे. तसेच वाहक विरहीत वाहन यांत AI च्या प्रणालीचा वापर केला जात आहे. जसे Google ची Wayma-self driving चे प्रयोग सुरू असून लवकरचा ती आता रस्त्यावर उतरेल. स्वयंचलित वाहनांमुळे मानवाचा प्रवास जास्त सुखकारक होऊन मानवाला स्वतः वाहन चालविण्याची गरज नसेल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत उपकरण दैनंदिन काम जसे, online shopping, घरातील लहान सहान कामे, साफसफाई इ. करण्यास मदत करेल. तसेच आपल्याला आपल्या आरोग्याविषयी माहीती देणारी smart watches यात ही AI प्रणाली वापरलेली आढळते. " आजकाल बऱ्याच प्रचलित आणि लोकप्रिय झालेली ही Smart Watches. यातून आपल्याला आपल्या झोपेचा पॅटर्न, हृदयाची स्पंदने, व्यायाम याचा अभ्यास करून सगळी माहीती पूरवत आहेत.

 थोडक्यात येणारा काळ हा Artificial Intelligence चाच असणार.... टेस्ला, गुगल आणि ऍपल सारख्या कंपन्यांनी हया तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब सुरू केलेला असून मानवी जीवनात हया तंत्रज्ञानाद्वारे अमुलाग्र बदल दिसून येत आहे. यावरून असे लक्षात येते की, Artificial Intelligence हे टेकटीप्स computer science चाच एक भाग आहे. AI तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतेही मशीन मनुष्यासारखेच बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते, करू शकते. मनुष्यासारखे स्वतः डोके वापरून काम करू शकते.

टेक्नॉलॉजीत येऊ घातलेल्या या क्रांतीमुळे लवकरच आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात या AI प्रणालीचा अतिशय मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्यास सुरुवात होत आहे. 'भविष्य हे स्वयंचलित उपकरणाचचं असणार हे मात्र नक्की...

'कृत्रिम बुद्धिमत्ता' निर्माण करणाऱ्या संशोधकांमध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहे. 'मेंदू' हे दुसरे-तिसरे काही नसून एक जैविक यंत्रच आहे. असे एक मतप्रवाह म्हणतो. यंत्राला जशा मर्यादा असतात अगदी तशाच मर्यादा मानवाच्या नैसर्गिक उत्क्रांतीला ही आहेत. मात्र, स्वत:चा विकास स्वतःच करावा अशी प्रशिक्षणे दिलेली ही यंत्र मानवजातीस कायमची नष्ट करतील किंवा गुलाम बनवतील, असा धोका व्यक्त केला जातो आहे. 

तर दुसऱ्या मतप्रवाहा नुसार मेंदूला यंत्र म्हणू शकत नाही. ती एक गुंता- गुंतीची जैविक निर्मिती आहे त्यामुळे या मानवनिर्मित यंत्रांपासून घाबरण्याचे कुठलेही कारण नाही.  आणि एक दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होऊन मानवजातीच्या ही पुढे जाऊ शकते  असे मानणारा शास्त्रज्ञांचा मोठा गट आहे. त्यांच्या मते  तर्कावर काम करणारे यंत्र एक वेळ आल्यावर थांबतात,  अडखळतात... पण मेंदूचे असे होत नाही. कारण मेंदू तर्काच्या ज्या पद्धतीने वापर करतो त्याप्रमाणे सृजनशीलताही करतो. मानवी भावना, व्यक्तिमत्व, सृजनशीलता, सर्जनशीलता, कलात्मकता, नवनिर्माण आदि गुण संपादन करणे हे यंत्रांना शक्य नाही.  कृत्रिम बुद्धिमता (AI) असलेल्या यंत्राने सर्जनशीलता दाखवली तरच मानवी आणि यांत्रिक  पातळीवर ते यंत्र यशस्वी होईन.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगाचे नुकसान सांगणारा मतप्रवाह ही आपल्याला विचारात घ्यावा लागेल. या AI तंत्रज्ञानामुळे यंत्रमानव बरीच कामे करत असल्याने नोकरवर्गाला कमी काम करावे लागेल, पर्यायाने बेरोजगारी वाढेल. फॅक्टरी, कंपन्या, कारखाने, बँका यांमधील AI च्या वापरामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जाऊन ते बेरोजगार होतील. तसेच ही AI प्रणालीवर आधारीत यंत्रे अतिशय खर्चिक असून खराब झाल्यास दुरुस्त करण्यास पैसा, वेळ अधिक लागू शकतो. AI च्या अतिवापरामुळे मानवातील रचनात्मक शक्ती कमी होईल. मानव कामचुकार, आळशी होण्याची शक्यता आहे.  स्वयंचलित यंत्रेच मानवजातीच नाश करतील की काय अशी भिती, असा धोका व्यक्त होत आहे. कारण ही स्वयंचलित यंत्रे योग्य-अयोग्य असा फरक करण्यास असमर्थ ठरतील.  यात फीड प्रोग्राम असल्याने ते त्यानुसारच काम करतील, असा युक्तीवाद ही काही गटांकडून व्यक्त होतांना दिसतो. 

विज्ञानाच्या या शाखेचा उपयोग मानव कल्याणासाठी विचारपूर्वकच करायला हवा. यावर पूर्णपणे विसंबून राहणे हानीकारक ठरू शकेल. योग्य प्रमाणावर वापर झाल्यावरच मानवी प्रगती होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे  तयार होणाऱ्या भविष्यातल्या गोष्टी या भाकीत करण्याच्या ही पलीकडील ठरतील. यातून होणारा बदल असामान्यच असेल हे खर असलं तरी ते टाळणे शक्य नाही. उर फुटेस्तोवर सतत धावणाऱ्या मानवजातीला थांबणे आता केवळ अशक्यच आहे. 

असे असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मृगजळामागे लागण्या ऐवजी न कळलेल्या मानवी बुद्धिमत्तेला समजून तिचा विकास करण्याची आवश्यकता जास्त आहे,. यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास देखील खऱ्या अर्थाने दडला आहे.  Artifcial Intelligence हे वेगाने पसरणारे एक नवीन तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये अनेक उद्योग बदलण्याची क्षमता आहे.  परंतू नोकरी विषयी ही चिंता निर्माण करणारी बाब आहे. याकरीता जोखीम कमी करत जास्तीत जास्त फायदेशीर, पारदर्शक आणि नैतिक अशी AI प्रणाली निर्माण करणे आवश्यक आहे. अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवनास असा स्पर्श केलेला आहे की या दुनियेत मानव आपले स्थान टिकवेल की भान हरपून जाईल हे काळच ठरवेल शेवटी आपण एवढेच म्हणू शकतो की...... 

'विज्ञानाने केली क्रांती

विज्ञानाने केली प्रगती 

विज्ञानाने दिला एक नवा ध्यास

विज्ञानाने केला संपूर्ण जगाचा विकास.

 याच विज्ञानाची धरूनि कास 

करु या मानव कल्याण, 

करु या मानव कल्याण.....

सौ दीपाली लीलावती निवृत्ती रायते-महाजन

शिक्षिका, नाशिक महानगरपालिका





टिप्पण्या

  1. खूपच छान लेख...
    एका नवीन विषयावर एवढे अभ्यासपूर्ण लेखन करणे हे खरोखरच कौशल्य दर्शविते... अभिनंदन आणि
    शुभेच्छा....
    💐💐💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर