Harshu


माझे परममित्र  श्री  मधुकर काशिनाथ नेरकर  यांची द्वितीय कन्या  *कै.सौ हर्षदा नेरकर - शेंडे* हीचे  काल दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी वयाच्या ३० व्या वर्षी  पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले.

तिच्या अकाली, अचानक जाण्याने संपुर्ण नेरकर कुटुंब दुःखाच्या खाईत लोटले गेले. कोणी कोणाला सावरायचे हेच कुणा कळेना. अशा या दुःखद परिस्थितीत  हा मृत्यू कसा झाला, तो टाळता आला असता का ?, अशा प्रसंगी आपल काय चुकले, यावरून बोध घेऊन आपण इतर अशा घटना टाळू शकतो का याबाबत, आपल्या मनातील भावना, घालमेल, डॉ सचिन येवले सरांच्या शब्दात (नेरकर साहेबांचे मोठे जावई) ...


|| "हरे कृष्णा" ||

               |  क्षणभंगूर आयुष्य | 

नमस्कार! 

मी डॉ सचिन येवले,

मी, आज मृत्युला ओळखूच शकलो नाही किंवा आज पर्यंत खरोखर कोणीच कसे ओळखू शकले नाही याची प्रचिती हर्षदा (माझी लहान मेव्हणी) च्या अवेळी जाण्याने मनात खोल खड्डा करून गेली. 

     घटनाक्रम, १४ एप्रिलच्या सायंकाळी  सर्व काम आटोपून घरी निघण्याच्या वेळी अचानक साडूचा फोन येतो आणि  सांगितले की, "हर्षदाचे हृदय एकाएकी बंद पडले आहे.,  ती बाथरूममध्ये पडलेली होती. आता हॉस्पिटलला  आणून ५-६ डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत." त्यांच्या बोलण्यातला कातरपणा व हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीन जणू निसटली. मला वैद्यकिय क्षेत्रातल्या अशा अनुभवांची जाणीव असल्याने तिचा  शेवट चमकून गेला.  पण आता  हे माझ्या पत्नीला, तिच्या वडिलांना, आईला  कसे सांगू हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला.  तरीही, "हर्षदाला भेटण्यासाठी तिच्या नातेवाईकांना बोलावून घ्या असे मत तिथल्या डॉक्टरांनी मांडल्यामुळे आपल्याला त्वरित पुण्याला जावे लागेल" असे सांगून,  मिळेल त्या पद्धतीने आम्ही पुण्यासाठी रवाना झालो.

   मनात अनेक प्रश्नांची खलबते दोलायमान झाली.

हर्षदाच्या पतीकडून सविस्तर माहिती मिळवताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. दुपारी शेवटचा १२.३० वा. तिच्या फोनवर केलेला शेवटचा मेसेज आणि त्यानंतरचे जवळजवळ ३०-३५ मिस्ड कॉल्स, यावरून दुपारी १२.३० ते १.०० दरम्यान  तिच्यावर काळाने घात केला असल्याचे समजले.

  सायंकाळी पती जेव्हा घरी येतात, बाथरूम मध्ये चालू असणारा पाण्याचा प्रवाह, एक्झॉस्ट फॅन, दिवा आणि वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद नसल्यामुळे दरवाजा तोडून बघता, ती बाथरूममध्ये जमिनीवर निपचीत पडलेली होती. रक्ताचा स्त्राव तोंडातुन आणि ओठाच्या बाजूने दिसला. थंडगार शरीर आणि बसलेली दातखीळ  जणू ती या जगाला खूप अगोदरच विराम देऊन गेल्याचे लक्षात आले.  मोबाईल हाच जणू आधार धरून घटनाक्रम मांडण्याचा प्रयत्न करु या. 

सकाळी १०.३० -  दोघेही पती आणि पत्नी  गप्पा मारून नाश्ता आटोपून, आपापल्या कामासाठी रुजू होतात.  १४ एप्रिल हा सुटीचा दिवस असल्यामुळे, हर्षदा घरीच आपला  Reserch topic अभ्यासण्यात लागली आणि पती आपल्या व्यवसायाला घराबाहेर पडतात.

दु 12.08

Last Seen today at 12.08 हाच जणू आम्हा सर्वासाठी तिचा निरोप.  त्यानंतर ती स्नानासाठी जाते.

दु. १२.५१

फोनवर आलेला कॉल उचलला जात नाही. पुढील ३ तासात delivery Boy (Amazon) चे ७-८ कॉल येतात. तिचे निरुत्तर पाहून  alternate No. वर म्हणजेच सासूबाई च्या मोबाईल वर कॉल जातात.  त्याही तीला दुपारी ३-४ कॉल करतात. पण, कामाच्या गराड्यात कदाचित फोन उचलत नसेल, अशीच मनाची समजून घालून सर्वांनी तिच्या फोनवरील निरुत्तराकडे दुर्लक्ष केले. 

नेमके काय घडले असणार स्नानावेळी की ,  तीला काळाने ओढून नेले. 

आकलन-१  --  गॅस गिझरच्या बऱ्याच घटना दिवसेंदिवस ऐकिवात येतात, त्यामुळे ती एक परिस्थिती लक्षात घेतली तरी पण,  Exhaust fan चालूच होता म्हणजे.... तशीही शंका माझ्या मनात विरून गेली.

आकलन - २  ---  तिच्या मासिक पाळीचा २रा दिवस म्हणजे अंगात कणकण आणि शारीरीक थकवा. त्यात सकाळी तिने जेवण न करता, पतीसोबत चहा- खारीच घेतले होते आणि मी निवांत जेवन असे पतीला सांगितले होते.

अचानक गरम पाण्याच्या स्नानामूळे किंवा अशक्तपणा मुळे भोवळ येऊन पडली असणार, किंवा पाय घसरून पडली असणार असे शंकांचे काहूर. पण शरीरावर ओठांच्या बाजूला छोटी जखम सोडता, कोठेही, कोणतेही साधे खरचटलेले सुद्धा दिसले नाही. 

 ना डोक्याला इजा, ना कानाला रक्त किंवा तत्सम Head injury signs काहीच दिसल्या नाहीत. 

 आकलन ३ --- वय वर्ष ३०, खूपच सडपातळ, कोणताही आजार, किंवा Health problem नाही.  पण Heart attack म्हणजे देवाघरचे ताबडतोब बोलावणे ही सुद्धा एक बाजू असू शकते.

आकलन  ४ ----   electric  shock लागून वगैरे,  पण तसेही काही लक्षणे शरीरावर कुठेही जाणवून आले नाही.

या पद्धतीने प्रवासात मनाशी आकलन मांडता मांडता रात्री एकच्या सुमारास आम्ही हॉस्पिटलला पोहोचलों , ते फक्त तिला शेवटचे बघण्यासाठीच.  काही शंका आणि शक्यता मनात ठेऊन डॉ प्रज्ञा आणि डॉ गौरव (तिचा भाऊ) सह सर्वांनी निरखून  बघता कोठेही काहीच इजा, किंवा मार लागल्याची खूण सुद्धा जाणवली नाही.  अत्यंत सोशिक अशी हर्षदा हा मृत्यू सुद्धा साधेपणाने आणि खंबीरपणे सहज पार करून गेली. 

तिची शैक्षणिक पार्श्वभूमी - 

के के वाघ इंजीनियरिंग कॉलेज नाशिक येथून बीई आणि त्यानंतर पॉवर सिस्टीम मध्ये एम.ई. केल्यानंतर , सुरत (गुजरात) येथील पॉवर ग्रिड इंटिग्रेशन  येथे Ph.D करण्यासाठी गेली होती. 3 वर्षांच्या आता शेवटच्या टप्प्यात म्हणजे 2 महिन्यात तिला Ph. D. पदवी मिळणार होती.  असा तिची  विलक्षण शेक्षणिक पार्श्वभूमी. 

दोनच वर्षांपूर्वी  लग्न  झालेले असूनही Career ला महत्त्व देऊन मोठ्या जिद्दीने PhD संपवून आता संसाराला सुरुवात करू म्हणून एका नवीन घरात तिने तिचा संसार थाटायला आणि सजवायला सुरुवात केली होती. त्याच घराच्या सुशोभीकरणासाठी Amazon वरून मागवलेले साहित्य ती स्विकारू शकली नाही कारण, काळाने अगोदरच तिच्यावर त्याचा घाव घातला. केव्हढा हा दुर्दैवविलास...

तिचे वैयक्तिक आयुष्य -  आपण Ph.D. संपवून मगच बाकी सर्व साध्य करू अशा खंबीर निर्धाराने, मोठ्या आवेशात तिने अभ्यासाला सुरवात केली होती.  संपूर्ण Covid काळ सुध्दा तिने हॉस्टेललाच राहून Phd ची तपश्चर्या अखंड सुरू ठेवली.  हॉस्टेलला मोजून 7 मूली,  ज्या बंद मुळे घरी जाऊ शकत नव्हत्या,  त्यांच्यासोबत कोविड काळात तिने आपला अभ्यासक्रम चालूच ठेवला. बोलके व्यक्तिमत्व, easy going nature, जिवाला जीव देणारी व्यक्ती म्हणून ख्याती असलेली हर्षदा, तिच्यासाठी संपूर्ण हॉस्टेलच तिचे कुटुंब होते.

पुढील दोन महिन्यात, तिच्या Ph. D. च्या रूपाने तिला व  तिच्या दोन्ही कुटुंबियांना, तिच्या व त्यांच्या तपश्चर्येचे फळ मिळणार होते. त्यामुळे सर्व कुटुंब हर्षउल्हासित होते. ती स्वतः  Phd  करून पुढील तयारीला लागली होती.  प्रतिष्ठीत Research institute मध्ये तिची नियुक्ती होऊन केरळच्या इलेक्ट्रिसिटी चे अवलोकनाचे काम तिच्यावर सुपूर्त करण्यात आले होते.

अतिशय  दृढनिश्चयी असलेल्या हर्षदाने, पुढच्या सर्व जबाबदाऱ्या  कशा पार पाडायच्या हे आधीच आखून ठेवलेले होते.  अशी हर्षदा आपले जीवन खंबीरपणे, समाधानाने आणि सर्वांना आनंद देऊन व त्यात समरस होण्यासाठी सज्ज होत होती. पण...

शेवटी  कारणमिमांसा कितीही मांडली तरी आमची लाडकी आता हर्षदा आमच्यात नाही., हा विचारच मनाला खोल करून जातो. ती आमच्यात नाही यावर विश्वासच बसत नाहीये.  विवान (माझा मुलगा) तर  मावशी अशी कशी कोठे जाऊ शकते? असा निरागस प्रश्न करतोय.  त्याच्या प्रश्नाला डॉक्टर असूनही आम्ही सर्व निरुत्तर आहोत.  काय करावे, काहीच समजत नाही, कोणी कोणाची अन कशी समजूत काढावी हेच न सुचल्यामुळे, मन मोकळे व्हावे म्हणून मनातलं काहूर कागदावर उतरवले.

अखेरीस, आयुष्याची दोरी आणि परमेश्वराचे नियम यापुढे मनुष्य, आम्ही डॉक्टर, आणि सर्व समाज हतबल आहे.  'क्षणभंगुर आयुष्य!'

डॉ सचिन येवले, 

Dermatologist, Nashik


या निमित्ताने सर्वांनी पुढील बाबींची नक्कीच काळजी घ्यायला हवी असे सुचवावेसे वाटते, जेणेकरून पुन्हा दुसऱ्या हर्षदावर ही वेळ येणार नाही. 

1. आपल्या घरातील गॅस गिझर, इलेक्ट्रिक गिझर यांची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांचे पाइप, वायरिंग, गॅस नळी यांची देखभाल, गरजेनुसार बदल अतिआवश्यक आहे.

2. गॅस गिझर वापरत असतांना कधीच दरवाजा बंद करून बाथरूम मध्ये थांबू नका. गरम पाणी बादलीत पूर्ण भरून घेतल्यानंतरच काही वेळाने आत जा. तोपर्यंत बाहेरच थांबावे. 

3. जेंव्हा घरात एकटी व्यक्ती असेल, तेंव्हा दिवसभरातून किमान 1-2 वेळा फोन करून तिच्याविषयी चौकशी करा. हल्ली कोठेही संपर्क करणे अतिशय सोपे आहे. कदाचित अडचणीत असलेल्या व्यक्तीला आपल्या फोनमुळे वेळेत मदत मिळू शकेल. 

4. आपले शेजारी किंवा जवळचे परिचित / नातेवाईक यांचेशी संपर्कात असणे गरजेचे आहे, त्यांची अशा अडचणीत मोलाची मदत होऊ शकते. 

5. या केसमध्ये पतीने सकाळी ऑफिस ला गेल्यावर सायंकाळ पर्यंत पत्नीस संपर्क केलाच नाही, कदाचित फोन उचलला जात नाही असे लक्षात आले असते आणि ताबडतोब घरी आले असते, किंवा आजूबाजूच्या व्यक्तींची मदत घेतली असती तर कदाचित आज हर्षदा आपल्यात असती. त्यामुळे संपर्क अतिशय महत्वाचा आहे. 

6. आई कडून कळल्यानंतर देखील पतीने घरी संपर्क करण्यात किंवा घरी पोहोचण्यात अतिशय दिरंगाई केली असे दिसते. केवळ आम्ही दिवसभर एकमेकांना फोन करीत नाही म्हणून पत्नीच्या फोनवरून वारंवार फोन करून देखील उत्तर येत नाही, ही बाब अतिशय सहज पणे घेतली,  त्याकडे नित्यासारखे दुर्लक्ष करणे ही गंभीर  बाब मोठे नुकसान करून गेली. म्हणून कोणतीही अनैसर्गिक बाब सहजपणे न घेता गांभीर्यानेच घ्यावी व त्यामुळे पुन्हा एकदा संपर्क अतिशय महत्वाचा आहे. 

7. या दुर्लक्षामुळे आपली चूक असो अथवा नसो, संशयाची सुई आपल्याकडे जाते. असा गैरसमज निर्माण होऊ न देण्याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.


टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. Very sad news. Om Shanti 🙏. After reading article point no 5 looks absurd. If wife doesn’t pickup phone, we never assume she is in danger. We think she must be busy. There is work pressure, commitment at work. its an I’ll thought

      हटवा
  2. परमेश्वर इच्छा असली तरी वर नमुद केल्या प्रमाने कालजी घेने गर्जेचे आहे

    उत्तर द्याहटवा
  3. पोस्टमार्टम नंतर काय निदान झाले, हे share केले असते तर आणखी सजगता आली असती, खूप दुर्दैवी घटना.

    उत्तर द्याहटवा
  4. देव घरच्यांना शक्ती सामर्थ्य देवो दुःखातून सावरण्यासाठी आणि हर्शदाच्या आत्म्यास शांती लाभो.तुम्ही सांगितल्या प्रमाणे काळजी घेवू.

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय वाईट घटना नेरकर सर म्हणजेच देव माणूस त्यांना हे दु :ख पेलण्याची शेक्ती परमेश्वर देवो ही ईश्वर चेरनी प्रार्थना.

    उत्तर द्याहटवा
  6. भावपुर्ण श्रद्धांजली💐

    उत्तर द्याहटवा
  7. परमेश्वर हे दुःख पेलण्याची शक्ती तिच्या कुटुंबियांना देवो.

    उत्तर द्याहटवा
  8. देव ,घरच्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती सामर्थ्य देवो , आणि हर्शदाच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली, डॉक्टर सचिन येवले सरांनी त्यांचे मनोगत अत्यंत भावपूर्ण शब्दात लिहिले आहे, त्यांनी सांगितल्या प्रमाणे काळजी घेने हेच महत्वाचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. Please share postmortem report this same thing is happening with lot of youngsters. Is this effect of covid .condolences with family

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अतिशय वाईट आणि मनाला चटका लावणारी घटना. This can b a case of pulmunar embolisms. Some infections in our body can be fatal nowadays.

      हटवा
  10. Never force your children for the goals which parents have in mind. Give them space as they are grown up and capable. Always tell them, learn to enjoy life and not make it race. Parents sometime forget the basics.

    उत्तर द्याहटवा
  11. अतिशय दुःखद घटना आहे जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  12. भावपुर्ण श्रद्धांजली💐

    उत्तर द्याहटवा
  13. अतिशय दुर्दैवी घटना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  14. भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  15. अतिशय दु खद घटना, भावपूर्ण श्रध्दांजली, सर्वांनी बोध घेऊन काळजी घ्यावी ही विनंती

    उत्तर द्याहटवा
  16. Unexpected No words to say . Really very sad . But Harshu should get justice .

    उत्तर द्याहटवा
  17. || भावपूर्ण श्रद्धांजली ||
    नेरकर व शेंडे कुटुंबीयांना दु:ख् सहन करण्याची शक्ती मिळो.
    गॅस गिझर मधे तांत्रिक बिघाड दिसुन आला का? हे नमुद करणे आवश्यक होते.
    शेवटी डॉक्टर रिपोर्ट काय आहे?

    उत्तर द्याहटवा
  18. हे ऐकून मन सुन्न झालं वेगवेगळे तर्क वितर्क मनात येत आहेत परंतु जर तर च्या गोष्टी आहेत असं घडायला नको होतं .....

    उत्तर द्याहटवा
  19. भावपूर्ण श्रद्धांजली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर