माझी ब्रह्मगिरी पर्वत , त्र्यंबकेश्वर (नाशिक) परिक्रमा ...दि 27.8.23
ब्रह्मगिरी पर्वत , त्र्यंबकेश्वर (नाशिक) परिक्रमा . .. दरवर्षीच्या श्रावणात लोक त्रिंबकेश्वर च्या ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा (फेरी) करतात. फेरी लहान आणि मोठी अशा दोन मार्गांनी केली जाते. त्यांचे अंतर 28 ते 30 आणि 56 ते 62 किमी आहे. श्रावण महिन्यात शक्यतो तिसर्या सोमवारी च्या फेरीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या एका फेरीने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लागते अशी मान्यता आहे. यावेळी लाखो भाविक ही फेरी रात्री सुरू करतात. रविवारी रात्री सुरुवात करून सोमवारी सकाळपर्यंत परिक्रमा संपते. छोट्या परिक्रमेला साधारणतः सात ते नऊ तास लागतात. या वेळची गर्दी टाळण्यासाठी आताशा अनेक लोक दुसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी फेरी करतात करतात. बरेच लोक गर्दी नको म्हणून आठवड्याच्या इतर दिवशी देखील रमत गमत दिवसा फेरी पूर्ण करतात . रात्रीची फेरी केल्यास प्रवास न जाणवता इतरांसोबत सतत चालत राहत, परिक्रमा पूर्ण होते,. परंतु मग आपण या परिसराच्या निसर्ग सौंदर्याला पारखे होतो. त्यामुळे आम्ही निसर्ग सौंदर्य बघायचे म्हणून रात्रीचा प्रवास टाळला आणि रविवारी सकाळी फेरी करायचे ठरवले. रविवार म्हणजे 27 ऑगस्ट रोज