Harshu
माझे परममित्र श्री मधुकर काशिनाथ नेरकर यांची द्वितीय कन्या *कै.सौ हर्षदा नेरकर - शेंडे* हीचे काल दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी वयाच्या ३० व्या वर्षी पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले. तिच्या अकाली, अचानक जाण्याने संपुर्ण नेरकर कुटुंब दुःखाच्या खाईत लोटले गेले. कोणी कोणाला सावरायचे हेच कुणा कळेना. अशा या दुःखद परिस्थितीत हा मृत्यू कसा झाला, तो टाळता आला असता का ?, अशा प्रसंगी आपल काय चुकले, यावरून बोध घेऊन आपण इतर अशा घटना टाळू शकतो का याबाबत, आपल्या मनातील भावना, घालमेल, डॉ सचिन येवले सरांच्या शब्दात (नेरकर साहेबांचे मोठे जावई) ... || "हरे कृष्णा" || | क्षणभंगूर आयुष्य | नमस्कार! मी डॉ सचिन येवले, मी, आज मृत्युला ओळखूच शकलो नाही किंवा आज पर्यंत खरोखर कोणीच कसे ओळखू शकले नाही याची प्रचिती हर्षदा (माझी लहान मेव्हणी) च्या अवेळी जाण्याने मनात खोल खड्डा करून गेली. घटनाक्रम, १४ एप्रिलच्या सायंकाळी सर्व काम आटोपून घरी निघण्याच्या वेळी अचानक साडूचा फोन येतो आणि सांगितले की, "हर्षदाचे हृदय एकाएकी बंद पडले आहे., ती बाथरूममध्ये पडलेली होती. आता