1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा
आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा - श्री जगन्नाथ पुरी यात्रा प्रवास दिवस 1 व 2 - 03/04.12.2023 दि 3.12.23 ला नाशिकहून रेल्वेने निघून, दि 5 ते 14 डिसेंबर या कालावधीत श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी, कोणार्क येथील सूर्य मंदिर, भुवनेश्वर चिल्का सरोवर, गंगासागर कलकत्ता शहर, हावडा ब्रिज इत्यादी करून पुढे गया, बोध गया त्यानंतर वाराणसी आणि शेवटी प्रयाग (अलाहाबाद) करून विमानाने मुंबईला परत. अशा ठरलेल्या नियोजना प्रमाणे तयारी करून सर्वजण तीन तारखेला रात्री साडेदहा वाजता स्टेशनवर जमले आणि साडेअकराच्या ट्रेनची वाट बघू लागले. तीन यात्रांचा दांडगा अनुभव पाठीशी असल्यामुळे यावेळेस तयारीसाठी पाहिजे तेवढे टेन्शन किंवा काळजी नव्हती. सर्व सहज सहज तयार झाले. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची कृपा आणि श्री जगन्नाथ पुरी भगवान यांचा आशीर्वाद यामुळेच सौ शुभांगी सूर्यवंशी वहिनींची रजा आदल्या दिवशी मंजूर झाली आणि त्यांचे जोडीने आपल्या सोबत येणे नक्की झाले. त्याचप्रमाणे यावेळेस आमच्या सोबत जुन्यातले तीन सहकारी कमी झाले. दोन जण ऐनवेळी काही कारणामुळे रद्द झाल्याने त्यांच्या जागी श्री शांताराम शेलार आणि सुनी