कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मानवी जीवनास स्पर्श....
Artificial Intelligence चा मानवी जीवनाला स्पर्श... रोटरी क्लब ऑफ नासिक स्मार्ट सिटी यांचे मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेत आमच्या वहिनी सौ दीपाली लीलावती निवृत्ती रायते-महाजन यांनी पारितोषिक पटकावले. नाशिकमधील हॉटेल Emerald park येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ... विषय होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मानवी जीवनास स्पर्श .... आपल्या माहितीस्तव सदर निबंध लेखकाची परवानगी घेऊन केवळ ज्ञान वृद्धी साठी देत आहे... मानवाला अन्य सजीवांपासून संपूर्ण ब्रम्हांडात वेगळा ठरविणारा एकमेव शब्द म्हणजे "बुद्धिमत्ता". मानवाला बुद्धिमत्ता, बौद्धिक क्षमता, अंदाज क्षमता, तर्कशक्ती आणि विश्लेषणाच्या ताकदीवरच जग जिंकण शक्य झालं आहे... परंतु 'आता 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजेच 'Artificial Intelligence' असलेले मानवनिर्मित संगणक आणि यंत्रमानव, मानवाशीच स्पर्धा करू लागले आहेत. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनालाच स्पर्श करू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची की दुनिया रहस्यमयी, अद्भूत आहे. 'Artifical In